Human History: आफ्रिकेच्या जंगलात नाही तर इथे झाली होती मानवाची उत्पत्ती, संशोधनातून समोर आली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 00:04 IST2022-10-26T00:04:19+5:302022-10-26T00:04:54+5:30
Human History: पृथ्वीवर पहिला मानव कुठे जन्मला होता हे तुम्हाला माहिती आहे का? सुरुवातीचे मानव हे आफ्रिकेत जन्मले होते. हे सर्वसाधारणपणे सांगितले जाते. मात्र एका ७२ लाख वर्षांपूर्वीच्या मानवी जीवाश्मांमुळे आधीचे सर्व सिद्धांत बदलण्याची शक्यता आहे.

Human History: आफ्रिकेच्या जंगलात नाही तर इथे झाली होती मानवाची उत्पत्ती, संशोधनातून समोर आली माहिती
लंडन - पृथ्वीवर पहिला मानव कुठे जन्मला होता हे तुम्हाला माहिती आहे का? सुरुवातीचे मानव हे आफ्रिकेत जन्मले होते. हे सर्वसाधारणपणे सांगितले जाते. मात्र एका ७२ लाख वर्षांपूर्वीच्या मानवी जीवाश्मांमुळे आधीचे सर्व सिद्धांत बदलण्याची शक्यता आहे. या जीवाश्मांमधून मानवजातीची सुरुवात ही आफ्रिकेमधून नाही तर युरोपमधून झाल्याची माहिती समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे.
हे प्राचीन जीवाश्म हे भूमध्यसागरीय युरोपमधून एल ग्रेको नावाच्या एका होमिनिन प्रजातीशी संबंधित होता. हा शोध थेटपणे आधीच्या संशोधनांना आव्हान देत आहे. त्यामुळे याचं अध्ययन होणं खूप महत्त्वाचं आहे. १९४४मध्ये जेव्हा ग्रीसच्या पाइरगोस वासिलिसिसमध्ये एका अत्यंत प्राचीन मानवी जबड्याचा शोध लागला होता. तेव्हा बहुतांश मानववंशशास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
जेव्हा आधुनिक मानवाच्या उत्पत्तीचा विषय निघतो. तेव्हा दशकांपासून एक सिद्धांत प्रचलित आहे. तो म्हणजे सध्याचा प्रत्येक जीवित मानव हा आफ्रिकेतून जगभरात पसरलेल्या एका छोट्या समुहाचा भाग आहे. हा समूह तेव्हा संपूर्ण जगभरात पसरला होता. त्यामुळे आधीचे निअँडरथल मानव आणि डेनिसोवन्स विस्थापित झाले. मात्र, स्काय न्यूजच्या रिपोर्टनुसार या प्राचीन जबड्याच्या जीवाश्माचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमच्या मते आधुनिक मानवाचं जन्मस्थान हे आफ्रिका नाही तर पूर्व भूमध्यसागरी भाग राहिला आहे.