शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 08:52 IST

पाण्यामध्ये हा जीवाणू सापडण्याचे प्रकार ८ सप्टेंबरपासून सुरू झाले होते. पाण्यामध्ये अमिबा असल्याची बाब एका सहा वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर समोर आली होती

ठळक मुद्देपाणी पुरवठ्यामधून येणाऱ्या पाण्यामध्ये नाइगेलेरिया फाऊलेरी म्हणजेच मेंदू कुडतरणारा अमिबा सापडला आहेपाणीपुरवठ्यामध्ये हा अमिबा सापडल्यानंतर आठ शहरांमधील नागरिकांना टेक्सासमधील प्रशासनाने जारी केली खबरदारीची सूचनाखबरदारी घेऊन, सांभाळून राहा अन्यथा हा जीवाणू विध्वंस घडवून आणू शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे

टेक्सास (अमेरिका) - अमेरिकेच्या टेक्सास प्रांताच्या दक्षिण पूर्व भागात पाणी पुरवठ्यामध्ये एक धोकादायक जीवाणू सापडला आहे. हा जीवाणू मानवी मेंदू खात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यामध्ये हा अमिबा सापडल्यानंतर आठ शहरांमधील नागरिकांना टेक्सासमधील प्रशासनाने खबरदारीची सूचना जारी केली आहे. खबरदारी घेऊन, सांभाळून राहा अन्यथा हा जीवाणू विध्वंस घडवून आणू शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे.टेक्सास कमिशनने पर्यावरण गुणवत्तेच्या आधारावर वॉटर अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. पाणी पुरवठ्यामधून येणाऱ्या पाण्यामध्ये नाइगेलेरिया फाऊलेरी म्हणजेच मेंदू कुडतरणारा अमिबा सापडला आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर तत्काळ बंद करा, अशी सूचना केली आहे.टेक्सास कमिशन पर्यावरण गुणवत्तेचा विचार करून ब्राजोस्पोर्ट वॉटर अ‍ॅथॉरिटीसोबत मिळून लवकरात लवकर पाण्याची सध्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या माहितीनुसार मेंदू कुडतरणारा हा अमिबा सर्वसाधारणपणे माती, गरम पाण्याचे कुंड, नदी आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये सापडतात. हा अमिबा स्वच्छतेचा अभाव असलेल्या स्वीमिंग पूलमध्येसुद्धा मिळू शकतो. हा अमिबा औद्योगिक प्लँटमधून निघणाऱ्या गरम पाण्यामध्येसुद्धा आढळून येतो.

दरम्यान, अशाप्रकारचा जीवाणू आढळल्यानंतर पाण्याचा वापर न करण्याचा सल्ला लेक जॅक्सन, फ्रीपोर्ट, अँगलटन, ब्राजोरिया, रिचवूड, आयस्टर क्रिक, क्लूट आणि रोजनबर्ग परिसरासाठी जारी करण्यात आली आहे. टेक्सार प्रांतातील डाऊ केमिकल प्लँट आणि क्लेमेंस आणि वायने स्कॉट टेक्सास डिपार्टच्या क्रिमिनल जस्टिस येथे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. अमिबायुक्त पाण्याच्या वापरामुळे संकटाची शक्यता लेक जॅक्सन परिसरासाठी जारी करण्यात आली आहे.पाण्यामध्ये अमिबा सापडण्याचे प्रकार ८ सप्टेंबरपासून सुरू झाले होते. पाण्यामध्ये अमिबा असल्याची बाब एका सहा वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर समोर आली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

टॅग्स :Healthआरोग्यWaterपाणीUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय