शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:08 IST

Bunker Buster Bomb: अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील व्हाइट सॅन्ड्स मिसाइल रेंजमध्ये या शस्त्राची चाचणी घेण्यात आली होती.

अमेरिकेकडे असलेल्या एका अत्यंत धोकादायक अशा बॉम्बची सध्या जगभरात चर्चा सुरू झाली आहे. जीबीयू-५७ए/बी मॅसिव्ह ऑर्डेनन्स पेनेट्रेटर बॉम्ब असे त्याचे नाव असून, त्याचाच वापर अमेरिकेने इराणचा भूमिगत अणू तळ नष्ट करण्यासाठी केला. 

वजन सुमारे १३,६०० किलो

सुमारे १३,६०० किलो वजनाचा एक बॉम्ब असे अनेक बॉम्ब टाकून  इराणचे फॉर्डो आण्विक केंद्र नष्ट केले. यासोबत अमेरिकेच्या पाणबुड्यांनीही ३० टोमाहॉक क्षेपणास्त्रे इराणच्या नतांझ, इस्फहान आण्विक केंद्राच्या दिशेने डागली.

नतांझवर एक बस्टर बॉम्बही टाकण्यात आला. अचूक लक्ष्य भेदणारे सुमारे १३,६०० किलो वजनाचे हे शस्त्र कदाचित इराणच्या भूमिगत फोर्दो अणू केंद्रापर्यंत पोहोचू शकते. फोर्दो अणू केंद्र एका डोंगराच्या आत आहे. 

हा बॉम्ब कुणी बनवला? 

हा बॉम्ब बोइंग कंपनीने बनवला आहे आणि एमओपीचा आजपर्यंत कधीही युद्धामध्ये वापर झालेला नाही. अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील व्हाइट सॅन्ड्स मिसाइल रेंजमध्ये या शस्त्राची चाचणी घेण्यात आली आहे.

किती धोकादायक?

जीबीयू-५७ए/बी हे एक ‘अत्यंत धोकादायक भेदक शस्त्र’ आहे. खोल भूगर्भात असलेल्या आणि मजबूत बंकरांवर हल्ला करण्याची त्यात क्षमता आहे. 

bunker buster bomb wikipedia

६.२ मीटर लांबी असलेला हा बॉम्ब स्फोटापूर्वी जमिनीत सुमारे ६१ मीटर आत घुसू शकतो. खोलवर ड्रिल करून आत जाऊन तो मोठा स्फोट घडवून आणतो.

काही तासांत जगात कुठेही जाते? 

या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सची रेंज इंधन न भरता सुमारे ११,००० किलोमीटर इतकी आहे, तर एकदा उड्डाणादरम्यान इंधन भरल्यावर ही रेंज १८,५०० किलोमीटरपर्यंत वाढू शकते. त्यामुळे हे विमान जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी काही तासांत पोहोचू शकते.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाIranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पwarयुद्ध