इस्रायल-अमेरिकेने इराणला लक्ष्य केले. अमेरिकेचे हवाई हल्ले आणि इस्रायलकडून थेट अयातुल्लाह खामेनेई यांनाच लक्ष्य करण्यात आले. इस्रायल-अमेरिकेकडून राजधानी तेहरानसह इराणमधील अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले असून, यात ५५० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. इराणकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
इराणीयन रेड क्रिसेंट सोसायटीने सोमवारी सांगितले की, अमेरिका-इस्रायल यांच्याकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये जवळपास ५५० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. इराणमधील १३१ शहरांमध्ये हल्ले करण्यात आले आहेत.
हल्ल्यांमुळे लोक बंकरमध्ये
इराणकडूनही इस्रायलला प्रत्युत्तर दिले जात असून, इस्रायलमध्ये लोक भुयारी बंकरमध्ये आश्रयाला गेले आहेत. सरकारकडून सायरन वाजवून अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर लोक बंकरमध्ये राहत आहेत.
इराणने हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. इराणने सुरुवातीला इस्रायलवर हल्ले सुरू केले. त्यानंतर शेजारी देशात असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ले सुरू केले. इराणकडून कुवैत, सौदी अरेबिया, बहरीन या देशांमध्येही हल्ले केले जात आहे.
सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या एका तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही इराणने हल्ला केला आहे.
कुवैतमधील अमेरिकेतली दूतावासाजवळ मोठा स्फोट
कुवैतमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासाजवळ मोठा स्फोट होऊन धुराचे लोट आकाशात उडताना दिसले. हा हल्ला असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या घटनेनंतर अमेरिकन दूतावासाने कुवैतमधील आपल्या नागरिकांना आपापल्या घरात सुरक्षित राहण्यास सांगितले आहे.
Web Summary : Iran reports over 550 deaths in alleged US-Israeli airstrikes across 131 cities. Retaliatory attacks force Israelis into bunkers. Iran expands attacks to Kuwait, Saudi Arabia, and Bahrain, hitting a Saudi oil refinery and reportedly targeting the US embassy in Kuwait.
Web Summary : ईरान ने 131 शहरों में अमेरिकी-इजरायली हवाई हमलों में 550 से अधिक मौतों की सूचना दी। जवाबी हमलों से इजरायली बंकरों में जाने को मजबूर। ईरान ने कुवैत, सऊदी अरब और बहरीन पर हमले किए, सऊदी तेल रिफाइनरी पर हमला किया और कुवैत में अमेरिकी दूतावास को निशाना बनाया।