शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:16 IST

Israel-Iran conflict : इराणच्या दूतावासाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, १३ जून रोजी इस्रायलनेइराणच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत अनेक ठिकाणी, विशेषतः निवासी भागांत लष्करी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह तब्बल २२४ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२५७ जण जखमी झाले आहेत.

काय आहेत इराणचे आरोप?इराणच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने त्यांच्या हद्दीत घुसून हल्ला केला, जो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. कोणत्याही देशावर हल्ला करण्यास मनाई करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे (कलम २ (४)) इस्रायलने उल्लंघन केले आहे, असे इराणने म्हटले आहे. आपल्या संरक्षणासाठी योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला आहे, असेही इराणने स्पष्ट केले आहे.

दूतावासाने निवेदनात म्हटले की, इराण अमेरिकेशी अणुबॉम्बसंबंधी चर्चा करत असताना इस्रायलने हे हल्ले केले. इराणने जगातील सर्व देशांना या हल्ल्यांचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, इस्रायलमुळे जगभरात शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

इस्रायलवर अणुबॉम्ब आणि युद्धाचे आरोपइराणने इस्रायलवर अणुबॉम्ब बनवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला (IAEA) माहिती न देण्याचा आरोपही केला आहे. इतकेच नाही, तर इस्रायलने इराणच्या अणु-केंद्रांवर हल्ला केला आणि त्यांच्या शास्त्रज्ञांना तसेच प्राध्यापकांना मारले, असेही इराणचे म्हणणे आहे. या हल्ल्यांच्या बदल्यात इराणच्या सैन्याने इस्रायलच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला केला, असेही निवेदनात नमूद केले आहे.

इराणने इस्रायलला मध्य पूर्वेतील अशांतता आणि युद्धाचे मुख्य कारण ठरवले आहे. ही राजवट सतत आपल्या शेजारील देशांवर हल्ले करते आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करत नाही, असे इराणचे म्हणणे आहे. या प्रकरणी इस्रायलने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध