शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:47 IST

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. 

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले आहे. इस्रायलने गेल्या १३ जूनला इराणवर हल्ला केला आणि मध्यपूर्वेत गाझानंतर आणखी एका युद्धाला तोंड फोडले. या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले असून हजारो लोक जखमी झाले आहेत. यातच आता अमेरिकेनेही या संघर्षात उडी घेतली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दहा दिवासांपासून सुरू असलेल्या इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत इराणचे 865 लोक मारले गेले आहेत. तर 3396 हून अधिक जखमी झाले आहेत. याच बरोबर, इराणनेही तेल अवीवसह इस्रायलच्या 10 हून अधिक ठिकाणांना निशाणा बनवले आहे.

इराणचे इस्रायलवर मिसाइल हल्ले -अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या आसपासच्या १० ठिकाणांना लक्ष्य केले. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी एक इस्रायलच्या हैफा शहरात पडले. येथे एअर सायरनही वाजला नाही. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इराणने केलेल्या या हल्ल्यात एकूण ११ जण जखमी झाले आहेत.

इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची उडी -मध्यपूर्वेतील या संघर्षात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. काल रात्री अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इफ्तिखान या तीन अणुकेंद्रांवर जोरदार हवाई हल्ला केला. इराणनेही अमेरिकेच्या हल्ल्यांना दुजोरा देत, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

असं होतं अमेरिकेचं प्लॅनिंग -रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, इराणच्या अणु केंद्रांवर हल्ले करण्यासाठी इस्रायलने अमेरिकेला पूर्णपणे सहकार्य केले. या मोहिमेसाठी व्यवस्थित समन्वय ठेवण्यात आला होता. इराणवर हल्ला करण्यापूर्वी लढाऊ विमाने गुआम या तळावर आणली गेलेली होती. तसेच, अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील अणुकेंद्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासाठी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर करण्यात आला. अमेरिकेच्या बंकर बस्टर्स बॉम्बमुळे इराणच्या अणुकेंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाDeathमृत्यू