शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय संस्थेपासून भारताला किती दिवस दूर ठेवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 02:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सवाल । आमसभेत व्हिडिओ निवेदन

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय संरचनेपासून (डिसिजन-मेकिंग स्ट्रक्चर) भारताला किती दिवस दूर ठेवणार आहात, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रांच्या ७५ व्या आमसभेतील आमचर्चेत सहभागी होण्यासाठी जारी केलेल्या व्हिडिओ निवेदनात मोदी यांनी हे वक्तव्य केले.

संयुक्त राष्ट्र सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शक्तिशाली ‘सुरक्षा परिषदे’त कायम सदस्यत्व मिळावे, यासाठी भारत दीर्घ काळापासून प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. १५ सदस्यीय अस्थायी परिषदेवर दोन वर्षांसाठी झालेल्या भारताच्या निवडीचा कालावधी येत्या १ जोनवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या वक्तव्यास महत्त्व प्राप्त होते. मोदी यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वाधिक मोठा लोकशाही देश आहे. १.३ अब्ज लोक भारतात राहतात. भारतात होणाऱ्या संक्रमणात्मक बदलांचे परिणाम जगाच्या मोठ्या भूभागावर होत असतात. अशा देशाला संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणाºया संस्थेपासून किती दिवस दूर ठेवले जाणार आहे? १.३ अब्ज भारतीयांच्या मनात संयुक्त राष्ट्रांबद्दल अद्वितीय आदर आणि विश्वास आहे. भारतीयांना संयुक्त राष्ट्र सुधारणांची दीर्घ काळापासून प्रतीक्षा आहे, हेही तेवढेच सत्य आहे. सुधारणा प्रक्रिया खरोखरच आपल्या तार्किक निष्पत्तीपर्यंत पोहोचणार आहे का, याबाबत भारतीयांना आता चिंता वाटत आहे.पाक पंतप्रधानांच्या टीकेला सडेतोड उत्तरच्पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारतावर काश्मीरच्या मुद्यावरून केलेल्या गंभीर आरोपांना भारताने सडतोड उत्तर दिले आहे.च्भारताकडून काश्मिरात सरकार पुरस्कृत दहशतवाद पसरविला जात असून, जम्मू-काश्मीरच्या जनतेवर अत्याचार करणाºया भारतीय जवानांवर आंतरराष्ट्रीय समुदायाने कारवाई करावी, असे इम्रान खान यांनी आपल्या व्हिडिओ निवेदनात शुक्रवारी म्हटले होते.च्संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रथम सचिव मिजितो विनितो यांनी इम्रान खान यांचे भाषण सभागृहात दाखविले जात असताना सभात्याग केला होता. त्यानंतर ‘प्रत्युत्तराचा अधिकार’ वापरून विनितो यांनी भारताची जोरदार बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.च्तेथे भारताने लागू केलेले सर्व नियम आणि कायदे भारताचा अंतर्गत मामला आहे. वाद केवळ बेकायदेशीररीत्या पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरबाबत आहे. पाकने हा भूभाग रिकामा करावा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ