शनिवारी पहाटे इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून युद्धाचे ढग गडद झाले आहेत. इस्रायलने याला प्रतिबंधात्मक हल्ला म्हटले असून, इराणकडून होणारा संभाव्य मोठा हल्ला रोखण्यासाठी ही कारवाई केल्याचा दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने तेहरानसह इस्फहान, कोम आणि खोरमाबाद या महत्त्वाच्या शहरांमधील लष्करी तळांना लक्ष्य केले. धक्कादायक म्हणजे, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे घरही या हल्ल्यात नष्ट झाले. सुदैवाने, खामेनी त्यावेळी तिथे उपस्थित नव्हते. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
इराण आणि इस्रायल, कोण किती शक्तिशाली?
१) मनुष्यबळ:इराण: इराणकडे ६ लाख सक्रिय सैनिक आणि ३.५ लाख राखीव सैन्य आहे. संख्येच्या बाबतीत इराणचे पारडे जड आहे.इस्रायल: इस्रायलकडे १.७ लाख सक्रिय सैन्य असले तरी, त्यांच्याकडे ४.५ लाख उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित राखीव दल आहे जे काही तासांत तैनात होऊ शकते.
२) हवाई शक्ती:इस्रायल: इस्रायलकडे ६०० हून अधिक अत्याधुनिक विमाने आहेत. यामध्ये रडारला चकवा देणाऱ्या F-35 सारख्या 'स्टेल्थ' विमानांचा समावेश आहे.इराण: इराणकडे ५०० हून अधिक विमाने आहेत. परंतु, त्यातील बहुतांश जुन्या बनावटीची आहेत. निर्बंधांमुळे त्यांना ही विमाने अपग्रेड करण्यात अडचणी येत आहेत.
३) क्षेपणास्त्र तंत्रज्ञान:इराणची खरी ताकद त्यांची बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे आहे. इराणकडे हजारो क्षेपणास्त्रांचा साठा असून तो इस्रायलसाठी मोठा धोका आहे. याउलट इस्रायलकडे जगातील सर्वोत्तम 'आयर्न डोम' सारखी बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे, जी शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात सक्षम आहे.
४) संरक्षण बजेट:इस्रायल: २०२४ मध्ये ४६.५ अब्ज डॉलर्स खर्च. याशिवाय अमेरिकेची मोठी लष्करी मदत.इराण: बजेट मर्यादित असल्याने इराण प्रामुख्याने स्वस्त ड्रोन आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर भर देतो.
Web Summary : Israel struck Iran, escalating Middle East tensions. Military strengths compared: Iran has manpower, Israel advanced air power and defense. Iran relies on missiles; Israel, 'Iron Dome'.
Web Summary : इजराइल ने ईरान पर हमला किया, जिससे मध्य पूर्व में तनाव बढ़ गया। सैन्य शक्ति की तुलना: ईरान के पास जनशक्ति, इज़राइल के पास उन्नत हवाई शक्ति और रक्षा। ईरान मिसाइलों पर निर्भर; इज़राइल, 'आयरन डोम'।