China Oil Strategy: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे. दुसरीकडे चीनने अत्यंत शांतपणे खेळलेली एक मोठी खेळी आता समोर आली आहे. जगाला तेल टंचाईची भीती सतावत असताना चीनने मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून बफर स्टॉक तयार करून स्वतःला सुरक्षित केले आहे. चीनची ही रणनीती केवळ त्यांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी नाही, तर जागतिक तेल बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चीनची सायलेंट रणनीती; संकट येण्यापूर्वीच साठवणूक
२०२५ च्या सुरुवातीपासूनच्या कस्टम आणि शिपिंग डेटावरून असे दिसून येते की, चीनने आपल्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त कच्च्या तेलाची आयात केली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्येच चीनने दररोज सुमारे १.२४ दशलक्ष बॅरल अतिरिक्त साठा जमा केला. चीनने हे तेल तेव्हा खरेदी केले जेव्हा ब्रेंट क्रूडची किंमत ६० डॉलरच्या आसपास होती. आता जेव्हा किमती गगनाला भिडत आहेत, तेव्हा चीनकडे स्वस्त तेलाचा मोठा साठा उपलब्ध आहे.
प्रतिबंधित देशांकडून खरेदी
चीनने आपले तेल साठे भरण्यासाठी प्रामुख्याने रशिया, इराण आणि वेनेझुएला या देशांकडून खरेदी वाढवली आहे. या देशांवर पाश्चात्य देशांनी निर्बंध लादले असल्यामुळे चीनला तेथून जागतिक बाजारापेक्षा खूपच कमी दरात तेल मिळाले. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, चीनने निर्बंधांचे रूपांतर स्वतःच्या फायद्यात करून घेतले आहे.
ब्लॅकरॉकचे मुख्य कार्यकारी लॅरी फिंक यांनी इशारा दिला आहे की, जर कच्च्या तेलाचे दर १५० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले, तर जगात मोठी आर्थिक मंदी येऊ शकते. मॅक्वेरी आणि कोटक सिक्युरिटीज सारख्या नामांकित ब्रोकरेज फर्म्सच्या मते, पश्चिम आशियातील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास किमती १२० ते १५० डॉलरच्या दरम्यान स्थिरावतील.
चीनचे सीक्रेट ऑईल टँक्स
गेल्या दशकात चीनने तेल साठवण्यासाठी दोन स्तरांची यंत्रणा उभी केली आहे. ज्यामध्ये सरकारी नियंत्रणाखालील गुप्त भूमिगत साठे आणि सरकारी कंपन्यांच्या मालकीचे टँक फार्म्स आहेत. चीनची एकूण इंधन साठवणूक क्षमता १.१ ते १.२ अब्ज बॅरल इतकी प्रचंड असल्याचा अंदाज आहे. चीन या साठ्याचा वापर केवळ आणीबाणीसाठी करत नाही, तर बाजारपेठ नियंत्रित करण्यासाठी एक साधन म्हणून करतो.
जगासाठी नवी अडचण
चीनच्या या साठेबाजीमुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती खाली येण्यास अडथळा निर्माण होत आहे. जेव्हा किमती कमी होतात, तेव्हा चीन मोठ्या प्रमाणावर खरेदी करून किमतींना आधार देतो. यामुळे इतर देशांना महागडे तेल विकत घ्यावे लागत आहे, तर चीन मात्र जुन्या स्वस्त तेलावर आपली अर्थव्यवस्था चालवत आहे.
Web Summary : Amid global oil price volatility, China strategically built a massive, cheap buffer stock by importing heavily from sanctioned nations like Russia and Iran. This stockpile, exceeding 1 billion barrels, secures China's energy needs and gives it market control, hindering price drops for other nations.
Web Summary : वैश्विक तेल की कीमतों में अस्थिरता के बीच, चीन ने रूस और ईरान जैसे देशों से भारी मात्रा में आयात करके एक विशाल बफर स्टॉक बनाया है। यह भंडार, 1 बिलियन बैरल से अधिक, चीन की ऊर्जा जरूरतों को सुरक्षित करता है और इसे बाजार नियंत्रण देता है, जिससे अन्य देशों के लिए कीमतों में गिरावट बाधित होती है।