गर्लफ्रेंडसोबत कसं आयुष्य जगतायत बिल गेट्स? मुलाखतीत उघड केली अनेक गुपितं; २०२१ मध्ये झाला होता घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 20:24 IST2025-02-05T20:23:54+5:302025-02-05T20:24:48+5:30
महत्वाचे म्हणजे, 2021 मध्ये मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यासोबत झालेल्या हाय-प्रोफाइल घटस्फोटानंतर, बिल गेट्स यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात उघडपणे बोलण्याचा हा दुर्मिळ योग होता.

गर्लफ्रेंडसोबत कसं आयुष्य जगतायत बिल गेट्स? मुलाखतीत उघड केली अनेक गुपितं; २०२१ मध्ये झाला होता घटस्फोट
अब्जाधीश बिल गेट्स यांनी नुकतेच एका मुलाखतीत पाउला हर्ड (Paula Hurd) सोबतच्या आपल्या रिलेशनशिपसंदर्भात भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पाउला यांना 'सेरिअस गर्लफ्रेंड' म्हणून संबोधले. गेट्स म्हणाले की, ते दोघेही एकत्रितपणे खूप मजा करत आहेत. माइक्रोसॉफ्टचे को-फाउंडर 69 वर्षीय बिल गेट्स यांनी एका अमेरिकन न्यूज चॅनलला मुलाखत दिली.
महत्वाचे म्हणजे, 2021 मध्ये मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यासोबत झालेल्या हाय-प्रोफाइल घटस्फोटानंतर, बिल गेट्स यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात उघडपणे बोलण्याचा हा दुर्मिळ योग होता.
२०२३ नंतर, बिल गेट्स आणि पॉला हर्ड अनेक कार्यक्रमांत एकत्रित दिसले -
साधारणपणे २०२२ पासून, हे दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्रित दिसून आले आहेत. खरे तर, त्यांनी एक वर्ष त्यांच्या संबंधांची पुष्टी केली नव्हती. मात्र, २०२३ नंतर, बिल गेट्स आणि पॉला हर्ड यांनी अनेक कार्यक्रमांना एकत्रितपणे हजेरी लावली. ते २०२४ मध्ये ऑलिंपिक खेळ पाहण्यासाठीही गेले होते.
नेमकं काय म्हणाले बिल गेट्स -
यासंदर्भात बोलताना, बिल गेट्स म्हणाले, "मी अत्यंत आनंदी आहे की, माझ्यासोबत पाउला सारखी सेरिअस गर्लफ्रेंड आहे. आम्ही दोघेही एकत्रितपणे खूप मजा करत आहेत. ओलंपिकला जात आहोत आणि अनेक चांगल्या गोष्टी करत आहोत."
महत्वाचे म्हणजे, पाउला हर्ड या ओरॅकल सीईओ मार्क हर्ड यांची पत्नी होती. त्यांच्या पतीने निधन झाले आहे. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य सेवेत मोठे काम केले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये, पाउला यांनी अनेक नॉन प्रॉफिट संस्थांसाठी निधी उभारण्याचे काम केले आहे.