अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक रि-एंट्रीच्या परमिटची मुदत कशी वाढवता येते?

By कुणाल गवाणकर | Published: November 21, 2020 11:49 PM2020-11-21T23:49:18+5:302020-11-21T23:49:41+5:30

रि-एंट्रीच्या परमिटमुळे अमेरिकेच्या अधिकृत कायमस्वरुपी नागरिकाला (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्ड धारकाला दोन वर्षे अमेरिकेबाहेर प्रवास करण्याची मुभा मिळते.

How can I extend my re entry permit to enter the United States | अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक रि-एंट्रीच्या परमिटची मुदत कशी वाढवता येते?

अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक रि-एंट्रीच्या परमिटची मुदत कशी वाढवता येते?

Next

प्रश्न: मी ग्रीन कार्ड धारक असून सध्या भारतात आहे. माझ्या रि-एंट्रीच्या परमिटची मुदत नुकतीच संपली. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी मी रि-एंट्रीच्या परमिटची मुदत कशी वाढवू शकतो?

उत्तर: रि-एंट्रीच्या परमिटमुळे अमेरिकेच्या अधिकृत कायमस्वरुपी नागरिकाला (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्ड धारकाला दोन वर्षे अमेरिकेबाहेर प्रवास करण्याची मुभा मिळते. रि-एंट्रीच्या परमिटशिवाय ३६५ दिवसांपेक्षा अधिक काळ अमेरिकेबाहेर असलेल्या एलपीआरचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं. त्यानंतर त्याला कदाचित अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी अर्ज करता येणार नाही. अमेरिकेबाहेर राहून रि-एंट्रीच्या परमिटची मुदत वाढवता येत नाही.

रि-एंट्री परमिट मिळवण्यासाठी ग्रीन कार्ड धारकानं देशाबाहेर प्रवास करण्याच्या काही दिवस आधी अमेरिकेत प्रत्यक्ष हजर असताना अर्ज आय-१३१ भरणं गरजेचं आहे. फोटो आणि बोटांचे ठसे देऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही तुम्ही स्वत: अमेरिकेत उपस्थित असणं आवश्यक आहे. तुम्ही अमेरिकेबाहेर प्रवास करण्याच्या ६० दिवस आधी रि-एंट्री परमिटसाठी अर्ज करायला हवा.

रि-एंट्री परमिट दोन वर्षांसाठी वैध असतं. तुमच्या रि-एंट्री परमिटची मुदत संपल्यास नव्या रि-एंट्री परमिटसाठी अमेरिकेत असताना अर्ज करावा लागतो. तुमचा रि-एंट्री परमिट वैध असताना आणखी एका रि-एंट्री परमिटसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला सध्याच्या रि-एंट्री परमिटसह अर्ज आय-१३१ जमा करावा लागतो. आधीच वैध असलेल्या रि-एंट्री परमिटला मुदतवाढ मिळत नाही. 

मुंबईतील अमेरिकेतील दूतावास रि-एंट्री परमिट देत नाही. ती जबाबदारी यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसची (यूएससीआयएस) आहे. तुम्हाला रि-एंट्री परमिटबद्दल अधिक प्रश्न असल्यास यूएससीआयएसच्या कॉल सेंटरवर संपर्क साधा किंवा https://www.uscis.gov/contactcenter ला भेट द्या.

Web Title: How can I extend my re entry permit to enter the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.