लँडिंगच्या परवानगीअभावी घिरट्या घालणारे विमान कोसळले, ४९ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:52 AM2018-03-13T04:52:38+5:302018-03-13T04:52:38+5:30

उतरण्याची परवानगी मिळत नसल्याने विमानतळाच्या आकाशातच घिरट्या घालत असलेले प्रवासी विमान काठमांडू विमानतळाजवळ कोसळले.

Horizontal plane collided with landing permission, 49 killed | लँडिंगच्या परवानगीअभावी घिरट्या घालणारे विमान कोसळले, ४९ ठार

लँडिंगच्या परवानगीअभावी घिरट्या घालणारे विमान कोसळले, ४९ ठार

Next

काठमांडू : उतरण्याची परवानगी मिळत नसल्याने विमानतळाच्या आकाशातच घिरट्या घालत असलेले प्रवासी विमान काठमांडू विमानतळाजवळ कोसळले. या भीषण अपघातता ४९ जण ठार तर अनेक जखमी झाले. विमानात कर्मचाºयांसह एकूण ७१ जण होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
युएस-बांग्ला या खासगी कंपनीचे हे विमान बांगलादेशमधील ढाका येथून नेपाळमधील काठमांडूला चालले होते. काठमांडू विमानतळाजवळ असलेल्या फूटबॉल मैदानावरच हे विमान कोसळले. घटनास्थळावर विमानाचे अक्षरश: तुकडे तुकडे इतस्तत: विखुरले होते.
दुर्घटनाग्रस्त विमानाला आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. जळालेले मृतदेह काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या हॉस्पिटलात हलविण्यात आले.
यापूर्वी सप्टेंबर २०१२ मध्येच माऊंट एव्हरेस्टला ट्रेकर्सना घेऊन चाललेले विमान काठमांडू विमानतळावरून उड्डाण घेताच कोसळले होते. या अपघातात १९ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था) धावपट्टीहून काही अंतरावर विमान कोसळलेल्या गवताळ भागात असंख्य कर्मचारी बचावकार्य करीत होते. डझनाहून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्यांनी लागलेली आग नियंत्रणात आणली. पडलेले विमान पाहण्यासाठी जवळच्या टेकडीवर स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. विमानतळावर उतरण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने या विमानाने काठमांडू विमानतळाभोवती दोन घिरट्या घातल्या होत्या. - मोहम्मद सेलीम, व्यवस्थापक, काठमांडू एअरलाईन्स
>एका अमेरिकन महिलेने प्रत्यक्ष पाहिला थरार
काठमांडू विमानतळावर उतरण्याच्या काही क्षण आधीच या विमानाने आपला मार्ग बदलल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मूळच्या अमेरिकन असलेल्या अमेन्डा समर्स कामानिमित्त नेपाळमध्ये राहतात. त्यांनी हा अपघात घराच्या गच्चीतून पाहिला. समर्स यांनी सांगितले की, विमान जमिनीपासून इतक्या जवळून उडत होते की मला वाटले ते आता टेकडीला धडकणारच. त्याचवेळी अचानक एक स्फोट झाला, त्यानंतर अनेक स्फोट झाले. नंतर अगदी काही क्षणातच आगीच्या ज्वाळा निघू लागल्या व काही वेळात शहरावर एकदम दाट धुराचे ढग दिसू लागले.

Web Title: Horizontal plane collided with landing permission, 49 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.