शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

अमेरिकेसाठी मोस्ट वाँटेड अफगाणिस्तानचा गृहमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 05:47 IST

हक्कानी मास्टरमाइंड हक्कानीवर अमेरिकेचे ५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस

ठळक मुद्देतालिबानच्या उद्यापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ४० एक वर्षांत पाकिस्ताननेच तालिबानला पोसले, मदत केली, मोठे केले. अमेरिका अफगाणिस्तानमधून निघून गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झालीय, ती जागा हडपण्यासाठीही चीनने तातडीने पावले उचलली

काबूल : अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी अखेर नवीन काळजीवाहू सरकारची घोषणा केली. पंतप्रधान म्हणून मुल्ला हसन अखुंद यांचे नाव घोषित केले तर मुल्ला अब्दुल गनी बरदार यांना त्यांचे कनिष्ठ बनवले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जाहीर केलेला सिराजुद्दीन हक्कानी याला या सरकारमध्ये गृहमंत्री बनवण्यात आले आहे. अमेरिकेने हक्कानी याच्यावर  ५ दशलक्ष डॉलर्सचे  बक्षीस जाहीर केलेले असून तालिबानने त्याला नव्या सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा मास्टरमाइंड सिराजुद्दीन हक्कानीचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सशी (आयएसआय) संबंध आहेत. त्याला आयएसआयचा प्रॉक्सीदेखील म्हटले जाते. अलीकडेच, आयएसआयचे मुख्य महासंचालक लेफ्टनंट जनरल फैज हमीद अफगाणिस्तानला गेले होते आणि काबूलमधील सेरेना हॉटेलमध्ये थांबले होते. या भेटीनंतर पाकिस्तानला तालिबान सरकारमध्ये आपले स्थान मजबूत करायचे आहे, असे मानले जात होते.सिराजुद्दीन हक्कानी २००८ मध्ये अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या हत्येच्या प्रयत्नांच्या नियोजनात सहभागी असल्याचे म्हटले जाते. 

तालिबानच्या उद्यापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या ४० एक वर्षांत पाकिस्ताननेच तालिबानला पोसले, मदत केली, मोठे केले. अमेरिका अफगाणिस्तानमधून निघून गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झालीय, ती जागा हडपण्यासाठीही चीनने तातडीने पावले उचलली. तालिबानचे नेते आधीपासूनच चीनचा सरकारी दौरे करत आलेले आहेत. रशियाने तालिबानशी आधीच चर्चा सुरू केली होती. त्यालाच मॉस्को फॉरमॅट असे म्हटले गेले. इराण आणि अफगाणिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी असा गंभीर प्रश्न आहे. तरीही अफगाणिस्तानने इराणला निमंत्रण दिले त्याचे कारण इराणचे धोरण. इस्लामच्या नावावर तुर्कीनं सध्या अनेक मुस्लीमबहुल देशांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न चालवलाय. त्याच कारणामुळे तो भारताविरोधात पाकिस्तानला मदत करतोय. तालिबान पुन्हा अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर आला त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कतारने पार पाडलेली भूमिका. तालिबानचे राजकीय कार्यालय कतारमध्ये उघडले गेले.

कोणतीही मास्टर डिग्री काही कामाची नसल्याचे शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे...

nअफगाणिस्तानचे नवे शिक्षणमंत्री शेख मौलवी नूरल्लाह मुनीर यांनी आजच्या काळात पीएच.डी. किंवा अन्य कोणतीही मास्टर डिग्री काही कामाची नाही, असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.nमंत्री शेख मौलवी यांचे म्हणणे असे की, आज देशात मुल्ला आणि तालिबानचे सरकार आहे. आमच्यापैकी कोणाकडेही कोणतीही डिग्री नाही तरी आम्ही महान आहोत. 

nतालिबान सरकारच्या स्थापना समारंभास तालिबानने फक्त ६ देशांनाच निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. हे देश पाकिस्तान, चीन, रशिया, इराण, कतार आणि तुर्की आहेत. भारत किंवा अमेरिकेला निमंत्रण नाही. त्याला काही ऐतिहासिक कारणे आहेत. 

टॅग्स :Americaअमेरिकाministerमंत्रीHome Ministryगृह मंत्रालयTalibanतालिबान