शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 06:40 IST

United State News: अवैध प्रवाशांविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला लॉस एंजलिसमध्ये प्रचंड विरोध सुरू झाला असून, या निदर्शनांना अटकाव करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या २ हजार जवानांना तैनात केले आहे.

पॅरामाऊंट (अमेरिका) - अवैध प्रवाशांविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला लॉस एंजलिसमध्ये प्रचंड विरोध सुरू झाला असून, या निदर्शनांना अटकाव करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या २ हजार जवानांना तैनात केले आहे. लॉस एंजलिसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असून पॅरामाऊंट शहरातही स्थानिक प्रशासनावर याच पक्षाची पकड आहे.

शुक्रवारी स्थलांतराच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४४ लोकांना अटक करण्यात आल्यानंतर काही नागरिकांची स्थानिक पोलिसांशी चकमक झाली होती. या वेळी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला होता. हा वाढता विरोध पाहता आता थेट लष्करी जवान तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील विविध राज्यांत तणाव आणखी वाढेल, असा आरोप कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर व डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते गॅव्हिन न्यूसम यांनी केला आहे.

अवैध प्रवाशांवर कारवाईसाठी लॉस एंजलिसमध्ये छापे टाकले गेले. यात १००हून अधिक लोकांना अटक झाली होती. नंतर शुक्रवारी झालेल्या कारवाईने या भागात तणाव अधिक वाढला. १९९२ मध्ये अशाच मुद्द्यावर अमेरिकेत दंगली पेटल्या होत्या. याच धर्तीवर आता हे आंदोलन पेटले आहे. (वृत्तसंस्था)

काय आहे प्रकरण? ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरिताचे नियम कडक करून अवैध प्रवाशांविरुद्ध मोहीम सुरू केल्यानंतर सुमारे १ हजार लोकांनी अमेरिकेत संबंधित विभागाला घेराव घातला. या ठिकाणचे अधिकारी व सीमा शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. इमारतीचेही नुकसान केले. यानंतर ट्रम्प प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलली आहेत. 

निदर्शकांनी आंदोलनात शहरातील अनेक भागांत आग लावली. कार पेटविण्यात आल्या, यादरम्यान अनेक घरे आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सनाही आग लावण्यात आली. निदर्शकांनी फलक हाती घेत सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी अनेकांना अटक केल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे.

परिस्थिती का चिघळली?कोणत्याही व्यक्तीला मास्क घालण्यास बंदी करण्यात आली आहे.निदर्शक लोक हे पैसे घेऊन दंगली भडकावत असल्याचा ट्रम्प प्रशासनाचा आरोप. तुरुंगात डांबण्याची धमकी. विद्यार्थी निदर्शनात उतरले, पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केल्यानंतर परिस्थिती चिघळली. 

हल्ले कराल तर तुरुंगात जाल : काश पटेलअमेरिकी तपास संस्था एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी लॉस एंजलिसमध्ये सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे. कोणीही पोलिसांवर हल्ला केला तर त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे पटेल यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :United StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पInternationalआंतरराष्ट्रीय