एपस्टीनच्या गुन्ह्यांची माहिती नाही, त्यांना भेटलेही नाही; हिलरी क्लिंटन यांची अमेरिकी काँग्रेसच्या समितीसमोर ६ तास साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 10:02 IST2026-02-28T09:56:38+5:302026-02-28T10:02:53+5:30

Epstein Files Hillary Clinton: दोन दिवस ही साक्ष चालणार असून, यात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचाही जबाब नोंदवला जाणार आहे.

Hillary Clinton testifies for 6 hours before US Congressional committee, says she has no knowledge of Epstein's crimes, never met him | एपस्टीनच्या गुन्ह्यांची माहिती नाही, त्यांना भेटलेही नाही; हिलरी क्लिंटन यांची अमेरिकी काँग्रेसच्या समितीसमोर ६ तास साक्ष

एपस्टीनच्या गुन्ह्यांची माहिती नाही, त्यांना भेटलेही नाही; हिलरी क्लिंटन यांची अमेरिकी काँग्रेसच्या समितीसमोर ६ तास साक्ष

वॉशिंग्टन : लैंगिक गुन्हेगार जेफरी एपस्टीन याच्याशी संबंधित वादग्रस्त फाइल्स अमेरिकेत खुल्या करण्यात आल्यानंतर यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या नावे आलेल्यांची अमेरिकी काँग्रेसच्या चौकशी समितीसमोर साक्ष सुरू आहे. यात गुरुवारी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचीही साक्ष झाली. एपस्टीनच्या गुन्ह्यांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी समितीला सांगितले.

एपस्टीन याला कधी भेटल्याचेही आपल्याला आठवत नसल्याचे हिलरी यांनी समितीला सांगितले. दोन दिवस ही साक्ष चालणार असून, यात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. हिलरी यांची ही बंदद्वार साक्ष सहा तास चालली.

काँग्रेस सदस्य जेम्स कॉमर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती याबाबत चौकशी करीत आहे.
आपले पती बिल क्लिंटन विविध सेवाभावी उपक्रमांच्या निमित्ताने एपस्टीनसोबत जात असत; परंतु त्याला मी कधी प्रत्यक्ष भेटल्याचे आठवत नाही, असे हिलरी यांचे म्हणणे आहे.

क्लिंटन फाउंडेशनच्या वतीने आयोजित परिषदांमध्ये एपस्टीन याच्या घिलेन मॅक्सवेल नामक माजी गर्ल फ्रेंडशी संवाद झाल्याचे हिलरी यांनी मान्य केले.

'सत्य बाहेर यायचे असेल तर ट्रम्प यांना प्रश्न विचारा'

अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लैंगिक गुन्हेगारांशी भूतकाळात असलेल्या संबंधांबाबत शपथेवर प्रश्न विचारा, असे आवाहन हिलरी यांनी केले. या प्रकरणातील सत्य बाहेर यायलाच हवे, असेही हिलरी यांनी म्हटले आहे.

समितीसमोर साक्ष झाल्यावर पत्रकार परिषद

हिलरी क्लिंटन यांनी चौकशी समितीसमोर साक्ष झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. आपली साक्ष जाहीर केली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही सदस्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आले नसल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला.

काय सांगतात दस्तऐवज?

न्याय विभागाच्या वतीने अमेरिकेत जाहीर एपस्टिन फाइल्समध्ये ७९ वर्षीय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्याच वयाचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन या दोघांचेही संदर्भ आहेत.

यासाठी नेमलेल्या चौकशी समितीसमोर आता क्लिंटन दाम्पत्याची साक्ष सुरू आहे. 

हिलरी यांचे युक्तिवाद

एपस्टिनच्या फाइलमध्ये सतत नाव येणे म्हणजे वाईट कृत्यच, असे नव्हे.

मी कधी एपस्टीनला भेटल्याचे किंवा त्याच्यासोबत विमान प्रवास केल्याचे आठवत नाही.

मी आयलँड किंवा त्याच्याशी संबंधित इमारतींत, कार्यालयांत कधीच गेले नाही. यामुळे एपस्टीनबाबत सांगण्यासारखे आपल्याकडे काहीही नसल्याचे हिलरी म्हणतात.

Web Title : हिलेरी क्लिंटन ने एपस्टीन पर गवाही दी, कांग्रेस के सामने ज्ञान से इनकार किया

Web Summary : हिलेरी क्लिंटन ने कांग्रेस के सामने गवाही दी, एपस्टीन के अपराधों के बारे में जानकारी से इनकार किया और उनसे मिलने की बात याद नहीं रही। उन्होंने अपने पति के एपस्टीन के साथ संबंध और घिसलेन मैक्सवेल के साथ संपर्क को स्वीकार किया। क्लिंटन ने ट्रम्प से यौन अपराधियों से उनके संबंधों के बारे में सवाल करने का आग्रह किया।

Web Title : Hillary Clinton Testifies on Epstein, Denies Knowledge, Encounters Before US Congress

Web Summary : Hillary Clinton testified before Congress, denying knowledge of Epstein's crimes or recalling meeting him. She acknowledged her husband's association with Epstein and contact with Ghislaine Maxwell. Clinton urged questioning Trump about his ties to sex offenders. She expressed disappointment over the closed-door testimony.