इथे 'हत्ती' देतात मसाज

By Admin | Updated: August 12, 2016 13:19 IST2016-08-12T13:19:14+5:302016-08-12T13:19:37+5:30

शरीरातील स्नायूंमध्ये मोकळेपणा यावा, रिलॅक्स ताजेतवाने वाटावे यासाठी शरीरावर मसाज केला जातो.

Here 'elephants' offer massages | इथे 'हत्ती' देतात मसाज

इथे 'हत्ती' देतात मसाज

ऑनलाइन लोकमत 

चांग माय, दि. १२ - शरीरातील स्नायूंमध्ये मोकळेपणा यावा, रिलॅक्स ताजेतवाने वाटावे यासाठी शरीरावर मसाज केला जातो. आज वेगवेगळया पद्धतीचे मसाज तंत्र बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामधून वेगवेगळे उपचारही केले जातात. मसाज हातांनी, बोटांनी,पायानी आणि उपकरणांनी केला जातो. 
 
पण हत्तीच्या पायांनी मसाज केला जात असेल तर ?. वाचून धक्का बसला ना. तैवानच्या चांग माय प्रांतात मसाजसाठी हत्तीचा वापर केला जातो.  हत्तीच्या पायांनी आणि सोंडेने मसाज केला जातो. वरचे छायाचित्र पाहून हत्तीच्या पायाखाली माणूस चिरडला जातोय असे तुम्हाला वाटेल. पण हा मसाज सुरु आहे. 
 
चांग माय प्रांतात माणसांना मसाज देण्यासाठी हत्तीना खास प्रशिक्षित केले आहे. अशा मसाजमध्ये हत्ती पिसाळला तर, दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने तैवानमध्ये काहीजण बंदी घालण्याची मागणी करत आहेत. 
 

Web Title: Here 'elephants' offer massages