हेलिकॉप्टरने शाळेत आलेला मुलगा
By Admin | Updated: April 3, 2017 05:11 IST2017-04-03T05:11:09+5:302017-04-03T05:11:09+5:30
आई-वडील वा पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी कार, बस, दुचाकी आदी साधने वापरतात.

हेलिकॉप्टरने शाळेत आलेला मुलगा
आई-वडील वा पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी कार, बस, दुचाकी आदी साधने वापरतात. परंतु हे प्रकरण फारच वेगळे आहे. युक्रेनमधील माजी क्रीडा मंत्र्याच्या मुलाला शाळेत जायला उशीर झाला होता. त्याला जर वडिलांनी रस्ते मार्गानेच पाठवले असते तर वाहतुकीमध्ये अडकून त्याला आणखी उशीर झाला असता. मग वडिलांनी मुलाला वेळेवर शाळेत पाठवले ते हेलिकॉप्टरने. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी हेलिकॉप्टर उतरताच तेथे असलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. अनेकांनी या दृश्याचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर अपलोडही केला.