शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

युरोपमध्ये मुसळधार; पुरामुळे १२५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 08:53 IST

युरोपमधील जर्मनी व बेल्जियम, नेदरलँड या देशांमध्ये मुसळधार पाऊस व नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरे कोसळली असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.

बर्लिन : युरोपमधील जर्मनी व बेल्जियम, नेदरलँड या देशांमध्ये मुसळधार पाऊस व नद्यांना आलेल्या पुरामुळे १२५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे कोसळली असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. काही ठिकाणी अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे १३०० लोक बेपत्ता असून, त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.

जर्मनीचा पश्चिम भाग व बेल्जियममध्ये पाऊस, पुराने थैमान घातले आहे. जर्मनीतील ऱ्हाईनलँड-पॅलटीनेट प्रांतामध्ये मुसळधार पावसाच्या तडाख्याने ६० जणांचा मृत्यू झाला आहे. सिन्झिंग शहरामध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या गृहसंकुलात अचानक पुराचे पाणी शिरून १२ जण बुडून मरण पावले. नॉर्थ ऱ्हाइन-वेस्टफालिया या भागात पावसाच्या तडाख्याने ४३ जणांनी जीव गमावला आहे. जर्मन सरकारने सांगितले की, पाऊस व पुराने केलेला विध्वंस धक्कादायक आहे. या घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसदारांना सरकारकडून मदत दिली जाईल.  जर्मनीमधील एरफ्टस्टाड या शहरामध्ये पुराच्या पाण्यामुळे घरातच अडकून पडलेल्या सुमारे १०० लोकांची सुटका करण्यात आली. हे बचावकार्य शनिवार सकाळपर्यंत सुरू होते.  नेदरलँडमधील रोअरमाँड भागात पावसामु‌ळे आलेल्या पुराने अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून, काही जणांचा बळी गेला आहे.  

सर्वांत जास्त फटका बेल्जियमला

युरोपमध्ये जर्मनीनंतर पाऊस व पुराचा सर्वांत जास्त तडाखा बेल्जियम या देशाला बसला आहे. तेथे आतापर्यंत १८ हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. बेल्जियमचे गृहमंत्री ॲनेलिस व्हेर्लिंडेन यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे १९ जण बेपत्ता असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मेऊस नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, दोन्ही काठांच्या जवळ असलेल्या अनेक घरांची पडझड झाली आहे.

अनेक मोटारी गेल्या वाहून

- पश्चिम युरोपमध्ये या आठवड्यात संततधार सुरू असून, पुराचे पाणी अनेक भागांत शिरले. त्यात रस्त्यांवर उभ्या असलेल्या अनेक मोटारी वाहून गेल्या.

- घरे भुईसपाट झाली. बेल्जियममध्ये बचावकार्यासाठी इटलीने मदतपथके पाठविली आहेत. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयGermanyजर्मनी