कुख्यात डॉन दाऊदला हृदयविकाराचा झटका?
By Admin | Updated: April 29, 2017 00:17 IST2017-04-28T23:57:59+5:302017-04-29T00:17:57+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हृदयविकाराचा झटका बसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुख्यात डॉन दाऊदला हृदयविकाराचा झटका?
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 28 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर? कराची : कुख्यात माफिया व तस्कर दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत नाजूक असून तो येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याच्या प्रकृतीबद्दल एक ना अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. एका बातमीनुसार दाऊदला हृदयविकाराचा झटका आला तर दुसºया बातमीनुसार त्याला ब्रेन ट्युमर झाला आहे. (वृत्तसंस्था) पाकिस्तानातील प्रसिद्ध डॉक्टरांनी त्याच्यावर २२ एप्रिल रोजी कराचीत शस्त्रक्रिया केली होती परंतु ती वाया गेली. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. त्याच्या गंभीर प्रकृतीची माहिती त्याच्या मुंबईतील कुटुंबियांना दिली गेली आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. डी कंपनीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदला २० दिवसांपूर्वी अर्धांगवायुचा झटका आला व त्यात त्याच्या शरीराचा उजवा भाग बधीर झाला.