‘त्या’ २५० महिलांना इसिसने ठार मारले

By Admin | Updated: April 22, 2016 05:43 IST2016-04-22T03:10:27+5:302016-04-22T05:43:59+5:30

अतिरेक्यांशी विवाह करण्यास आणि त्यांच्या गुलाम होण्यास नकार देणाऱ्या २५० पेक्षा अधिक महिला आणि तरुणींना इसिसने कथितरीत्या ठार मारल्याची घटना समोर आली आहे

He killed '250' of these women | ‘त्या’ २५० महिलांना इसिसने ठार मारले

‘त्या’ २५० महिलांना इसिसने ठार मारले

लंडन : अतिरेक्यांशी विवाह करण्यास आणि त्यांच्या गुलाम होण्यास नकार देणाऱ्या २५० पेक्षा अधिक महिला आणि तरुणींना इसिसने कथितरीत्या ठार मारल्याची घटना समोर आली आहे. मीडियाच्या एका वृत्तात हा दावा करण्यात आला आहे.
कुर्दिश डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रवक्ते सैद मामुजिनी यांनी सांगितले की, इसिसने मोसुलवर ताबा मिळविल्यानंतर या तरुणींना अतिरेक्यांशी विवाह करण्यासाठी आग्रह केला. ज्या तरुणींनी यास नकार दिला त्यांना या अतिरेक्यांनी ठार मारले. या तरुणींच्या अनेक नातेवाईकांनाही या अतिरेक्यांनी ठार मारले. एका वृत्तसंस्थेला मामुजिनी यांनी ही माहिती दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: He killed '250' of these women