शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:45 IST

अमेरिकेने भारतीय व्यावसायिक जुगविंदर सिंह ब्रार आणि त्यांच्या ४ कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

भारतीय व्यावसायिक जुगविंदर सिंह ब्रार आणि त्यांच्या चार कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. त्यांच्याविरोधात इराणी तेल वाहतूक केल्याच्या आरोप आहे. यामुळेच ही बंदी घालण्यात आली आहे. जुगविंदर सिंह ब्रार यांच्याकडे अनेक जहाजे आहेत आणि त्यांच्याद्वारे त्यांनी इराणी तेल निर्यात आणि आयात केले आहे, असं अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे म्हणणे आहे. अमेरिकेने इराणसोबत व्यापारावर बंदी घातली आहे. यानंतरही, जुगविंदर सिंह ब्रार यांनी इराणसोबतचे व्यवहार आणि व्यवसाय सुरू ठेवला, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. 

याबाबत अमेरिकेने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या  निवेदनात म्हटले आहे की, ब्राररची जहाजे चालवणाऱ्या यूएई आणि भारतस्थित दोन कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या जहाजांमधून इराणचे तेल इतर देशांमध्ये पाठवले जाते.

म्यानमारमध्ये भारतीय लष्करांचे Robo-Dogs पोहोचले मदतीला; भूकंपात दबल्या गेलेल्यांचा घेताहेत शोध

निवेदनात म्हटले आहे की, ब्रार याची जहाजे हाय रिस्क शिप टू शिप ट्रान्फरमध्ये सहभागी होती. ही जहाजे इराण, इराक, युएई आणि ओमानच्या आखातादरम्यान कार्यरत आहेत. या जहाजांमधून तेल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवत होते. या जहाजांनी इराणी तेलासाठी सुविधा पुरवण्याचे काम केले आहे आणि हे निर्बंधांचे थेट उल्लंघन आहे. अमेरिकेचे मंत्री स्कॉट बेसंट म्हणाले की, हे इराणचे कार्यरत मॉडेल आहे. ते अनेकदा बेकायदेशीर जहाजांशी आणि ब्रार सारख्या दलालांमार्फत व्यवहार करतात.

जुगविंदर सिंह ब्रार कोण आहे?जुगविंदर सिंह ब्रार हे युएईमध्ये राहतात. त्यांच्या दोन कंपन्या आहेत - प्राइम टँकर्स आणि ग्लोरी इंटरनॅशनल. अशी या कंपन्यांची नावे आहेत. ते सुमारे ३० जहाजासारखे पेट्रोलियम टँकर चालवतात. यापैकी बहुतेक लहान टँकर आहेत, हे लहान टँकर मोठ्या टँकरमधून येणारे तेल पोहोचवतात. या टँकरद्वारे समुद्रमार्गे तेल इतर ठिकाणी नेले जाते. या छोट्या जहाजांमधून ते इराणी तेलाची वाहतूक करत होते.   हे देखील तेल तस्करीचे प्रकरण असल्याचे मत अमेरिकेचे आहे. जुगविंदर सिंह ब्रार यांनी इराण समर्थित सशस्त्र संघटना हुथीसोबतही काम केले असल्याचा दावा अमेरिकेचा आहे.

टॅग्स :Americaअमेरिकाbusinessव्यवसायIranइराण