घृणास्पद - सामूहिक बलात्काराचं फेसबुक Live स्ट्रीमिंग

By Admin | Updated: March 27, 2017 11:24 IST2017-03-27T11:15:25+5:302017-03-27T11:24:18+5:30

एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूकवर लाईव्ह दाखवण्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला आहे.

Hateful - gang rape Facebook Live Streaming | घृणास्पद - सामूहिक बलात्काराचं फेसबुक Live स्ट्रीमिंग

घृणास्पद - सामूहिक बलात्काराचं फेसबुक Live स्ट्रीमिंग

ऑनलाइन लोकमत
न्यूयार्क, दि. 27 - एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूकवर लाईव्ह दाखवण्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला आहे.  स्थानिक माध्यमांमुळे ही घटना प्रकाशझोतात आली आहे. शिकागो डॉट सनटाइम्स डॉट कॉमच्या वृत्तानुसार, बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेच्या घरच्यांना त्या नराधमांनी धमकावले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या पीडितेसह घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे पीडितेसह घरच्यांना पोलिसांनी सुरक्षीत स्थळी पाठवले आहे.

सहा नराधमांनी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करुन त्याचे फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंगही केलं. धक्कादायक बाब म्हणजे , 15 वर्षाच्या मुलीवर सुरु असलेला अत्याचार 40 जण लाईव्ह पाहत होते मात्र त्यातील एकानेही पोलिसात तक्रार केली नाही.

आपली मुलगी घरी आली नाही म्हणून पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलीला पळवून नेण्याच्या धमक्या मिळत आहेत असे पीडितेच्या आईने पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Hateful - gang rape Facebook Live Streaming