Harris withdraws from US presidential race | अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून कमला हॅरिस यांची माघार
अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून कमला हॅरिस यांची माघार

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांच्या शर्यतीतून कमला हॅरिस यांनी अचानक माघार घेतली आहे. कमला हॅरिस या मूळ भारतीय असून, अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या सदस्या आहेत. प्रचार चालू ठेवण्यासाठी माझ्याकडे पुरसे पैसे नाहीत, असे स्पष्ट करून माघार घेत असल्याची घोषणा केली.
अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या अन्य उमेदवारांपैकी प्रभावी उमेदवार असलेल्या कमला हॅरिस यांनी मंगळवारी एक ट्विट करून आपण या शर्यतीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. सर्व समर्थकांचे आभार मानताना त्यांनी म्हटले आहे की, अत्यंत खेदाने माझ्या समर्थकांना सांगावेसे वाटते की, अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीची माझी प्रचार मोहीम थांबवीत आहे; परंतु मी सदैव लढत राहीन. सर्व जनतेला न्याय देण्यासाठीच ही मोहीम होती.

Web Title: Harris withdraws from US presidential race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.