शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उडणारे कंडोम काढताहेत इस्रायलचा दम; आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांमुळे चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 15:38 IST

हमासकडून हल्ल्यांसाठी कंडोम आणि फुग्यांचा वापर; प्रत्युत्तरादाखल इस्रायलचा एअर स्ट्राईक

तेलअवीव: इस्रायलमधील १२ वर्षांच्या नेतन्याहू शासन पर्वाचा अंत होऊन यामिना पक्षाचे ४९ वर्षीय नेते नफ्ताली बेनेट पंतप्रधान झाले. मात्र इस्रायलच्या आक्रमक भूमिकेत बदल झालेला नाही. पॅलेस्टाईन  विरुद्ध सुरू असलेला संघर्ष सुरुच आहे. इस्रायलनं पुन्हा एकदा गाजावर एअरस्ट्राईक केला आहे. वृत्तसंस्था एएफपीनं याबद्दलची माहिती दिली आहे. 

गाझावर एअरस्ट्राईक झाल्याचं वृत्त एएफपीनं पॅलेस्टिनी सुरक्षा दलांच्या हवाल्यानं दिलं आहे. बुधवारी सकाळी पॅलेस्टिनींकडून दक्षिण इस्रायलच्या दिशेनं पेट घेऊ शकणारे फुगे आणि कंडोम सोडण्यात आले. याच कंडोम आणि फुग्यांमुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला. हमास या दहशतवादी संघटनेनं कंडोम आणि फुगे सोडल्यानंतर इस्रायलनं थेट गाझावर एअर स्ट्राईक केला. 

कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या फुग्यांचा वापर पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी केला जात आहे. याशिवाय कंडोमच्या मदतीनंदेखील हल्ले केले जात आहेत. दहशतवादी संघटना हमास इस्रायलचं नुकसान करण्यासाठी फुगे आणि कंडोमचा वापर करत आहे. या माध्यमातून इस्रायलमधील नागरिकांच्या संपत्ती, शेती, बगिचे यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

दहशतवादी हल्ले करण्यासाठी कंडोम आणि फुगे फुगवताना हायड्रोजन किंवा हेलियमचा वापर करतात. या फुग्यांमध्ये मोलोटोव्ह कॉकटेल लावण्यात येतं. वाऱ्याची दिशा पाहून फुगे हवेत सोडले जातात. जिथे हे फुगे पडतात, तिथे स्फोट होऊन आग लागते. फुग्यांचा बॉम्ब म्हणून वापरण्याचं तंत्र जुनं आहे. १८४९ मध्ये ऑस्ट्रियानं सर्वप्रथम ही पद्धत वापरलं होतं. शस्त्रसंधी मोडीत काढत इस्राइलयाचा गाझावर पुन्हा एअरस्ट्राईक; उंच इमारती लक्ष्य, मोठं नुकसान

दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाविरोधात या तंत्राचा वापर केला होता. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या बहिणीचे फोटो असलेले फुगे दक्षिण कोरियाकडून आकाशात सोडले जात होते. त्यामुळे संतापलेल्या किमनं दक्षिण कोरियावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

टॅग्स :Israelइस्रायल