शस्त्रसंधी मोडीत काढत इस्राइलयाचा गाझावर पुन्हा एअरस्ट्राईक; उंच इमारती लक्ष्य, मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 07:38 AM2021-06-16T07:38:55+5:302021-06-16T07:44:42+5:30

इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला; गाझा पट्टीतील शांतता भंग

Israeli Air Force Launched Air Strikes On The Gaza Strip Early Wednesday | शस्त्रसंधी मोडीत काढत इस्राइलयाचा गाझावर पुन्हा एअरस्ट्राईक; उंच इमारती लक्ष्य, मोठं नुकसान

शस्त्रसंधी मोडीत काढत इस्राइलयाचा गाझावर पुन्हा एअरस्ट्राईक; उंच इमारती लक्ष्य, मोठं नुकसान

googlenewsNext

तेलअवीव: इस्रायलमधील १२ वर्षांच्या नेतन्याहू शासन पर्वाचा अंत होऊन यामिना पक्षाचे ४९ वर्षीय नेते नफ्ताली बेनेट पंतप्रधान झाले. मात्र इस्रायलच्या आक्रमक भूमिकेत बदल झालेला नाही. पॅलेस्टाईन  विरुद्ध सुरू असलेला संघर्ष सुरुच आहे. इस्रायलनं पुन्हा एकदा गाजावर एअरस्ट्राईक केला आहे. वृत्तसंस्था एएफपीनं याबद्दलची माहिती दिली आहे. याआधी इस्रायलमधील कट्टर राष्ट्रवाद्यांनी शेकडोंच्या संख्येनं जेरुसलेममध्ये संचलन केलं. मंगळवारी हे संचलन झाल्यानंतर काही तासांतच गाझावर एअरस्ट्राईक करण्यात आला. 

गाझावर एअरस्ट्राईक झाल्याचं वृत्त एएफपीनं पॅलेस्टिनी सुरक्षा दलांच्या हवाल्यानं दिलं आहे. बुधवारी सकाळी पॅलेस्टिनींकडून दक्षिण इस्रायलच्या दिशेन पेट घेऊ शकणारे फुगे सोडण्यात आले. त्यानंतर इस्रायलनं गाझावर एअरस्ट्राईक केला. तत्पूर्वी मंगळवारी जेरुसलेममध्ये इस्रायलमधील राष्ट्रवाद्यांनी संचलन करत शक्तिप्रदर्शन केलं. पूर्व जेरुसलेममध्ये करण्यात आलेल्या संचलनानंतर गाझा पट्टीतील हमासचे दहशतवादी आणि इस्रायलमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाला. शस्त्रसंधी करण्यात आल्यानं गेल्या काही दिवसांपासून गाझा पट्टीत शांतता होती.

इस्रायलमध्येच काहीच दिवसांपूर्वी सत्तांतर झालं आहे. यामिना पक्षाचे नफ्ताली बेनेट यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यामुळे इस्रायलमधील बेंजामिन नेतान्याहू युगाचा अंत झाला. नेतान्याहू १२ वर्षे इस्रायलचे नेतृत्त्व करत होते. सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. बेनेट यांचा शपथविधी रविवारी संपन्न झाला. त्यानंतर त्यांनी देशाचं नेतृत्त्व हाती घेतलं.
 

Web Title: Israeli Air Force Launched Air Strikes On The Gaza Strip Early Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.