हॉलएवढा मोठा होता जगातील पहिला संगणक
By Admin | Updated: June 25, 2017 00:25 IST2017-06-25T00:25:43+5:302017-06-25T00:25:43+5:30
संगणक आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलच्या रूपाने तो आज अगदी प्रत्येकाच्या हातात आहे

हॉलएवढा मोठा होता जगातील पहिला संगणक
वॉशिंग्टन : संगणक आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलच्या रूपाने तो आज अगदी प्रत्येकाच्या हातात आहे; परंतु जगातील पहिला संगणक कसा असेल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का?
संगणकाचा आकार दिवसेंदिवस लहान होत आहे. अगदी घरात वापरण्यात येणारे संगणकही (मॉनिटर, सीपीयू, की बोर्ड आणि माऊस) आता आऊटडेटेड होत असून त्यांची जागा छोटे लॅपटॉप आणि पामटॉपने घेतली आहे. लवकरच याहूनही छोटे संगणक येतील. तथापि, आकार लहान असूनही त्यांची कार्यक्षमता मात्र त्यांच्यापेक्षा अनेक पटीने जास्त असेल. छायाचित्रात तुम्ही जो पाहत आहात तो जगातील पहिला संगणक आहे. अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया विद्यापीठात १५ फेब्रुवारी १९४६ रोजी तयार करण्यात आलेला हा संगणक एखाद्या मोठ्या हॉलएवढा मोठा होता. त्यात तारांचे विशाल गुच्छ होते. अनेक माणसे मिळून तो चालवत. या अवाढव्य संगणकाचा तेव्हा अमेरिकी लष्करासाठी उपयोग केला जात होता. नंतर संगणक तंत्रज्ञान विकसित होत गेले. त्यांचा आकार लहान आणि कार्यक्षमता वाढत गेली. आज आमच्या हातात असलेले छोटे स्मार्टफोनही या संगणकाहून हजार पटीने कार्यक्षम आणि आधुनिक आहेत.