दरोडा टाकण्यासाठी अर्धा किमीचे भुयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:28 IST2017-10-28T05:28:05+5:302017-10-28T05:28:08+5:30
ब्राझील- ही घटना आहे ब्राझिलच्या साओ पाओलो शहरातील. एका बँकेतील ३३ कोटी डॉलरची रक्कम लुटण्यासाठी या दरोडेखोरांनी चक्क अर्धा किमीचे भुयार खोदले.

दरोडा टाकण्यासाठी अर्धा किमीचे भुयार
ब्राझील- ही घटना आहे ब्राझिलच्या साओ पाओलो शहरातील. एका बँकेतील ३३ कोटी डॉलरची रक्कम लुटण्यासाठी या दरोडेखोरांनी चक्क अर्धा किमीचे भुयार खोदले. या भुयाराची सुुरुवात एका भाड्याच्या घरापासून सुरू झाली. दीड मीटर रुंदीचे हे भुयार खोदण्यासाठी त्यांना चार महिने लागले; पण दरोडा टाकण्याच्या आतच पोलिसांना याची कुणकुण लागली आणि पोलिसांनी हे भुयारच सील केले. या प्रकरणातील १६ जणांनाही पकडण्यात आले. जर हे चोर हा दरोडा टाकण्यात यशस्वी झाले असते तर हा देशातील सर्वांत मोठा दरोडा असला असता, असे सांगण्यात येत आहे.