लाहोर न्यायालयात हाफिज सईदची सभा
By Admin | Updated: July 12, 2014 01:49 IST2014-07-12T01:49:16+5:302014-07-12T01:49:16+5:30
2008 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने लाहोर उच्च न्यायालयाच्या इमारतीत खुलेआम बैठक घेतली

लाहोर न्यायालयात हाफिज सईदची सभा
लाहोर : लष्कर ए तोयबा व जमात उद दवा या संघटना दहशतवादी असल्याची घोषणा अमेरिकेने केल्याला काही दिवसच उलटले असताना, 2008 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने लाहोर उच्च न्यायालयाच्या इमारतीत खुलेआम बैठक घेतली असून, नेहमीप्रमाणो भारत व अमेरिकेवर मुक्ताफळे उधळली आहेत. न्यायालयाच्या इमारतीतील या बैठकीत वकिलांची संख्या मोठी होती हे विशेष. न्यायालयात बैठक घेण्याची सईद याची ही दुसरी वेळ आहे. दहशतवादी म्हणून ठप्पा बसलेला असतानाही पाकिस्तानात खुलेआम फिरणा:या सईद याला लाहोर उच्च न्यायालयाच्या बार संघटनेने मुख्य पाहुणा म्हणून बोलावले होते. पाकिस्तानातील ही जुनी व प्रमुख बार संघटना आहे. पाकिस्तान जस्टिस पार्टीने ही बैठक आयोजित केली होती. (वृत्तसंस्था)