शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

हाफिझ सईदवरून अमेरिकेचा भारताला ठेंगा? अमेरिकेने दिलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत हाफिझ सईदचे नाव नसल्याचा पाकचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 12:04 AM

भारतविरोधी कारवाया करणारा कुख्यात दहशतवादी आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदवरून अमेरिकेने भारताला ठेंगा दाखवल्याची शंका उपस्थित होत आहे.

इस्लामाबाद - भारतविरोधी कारवाया करणारा कुख्यात दहशतवादी आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदवरून अमेरिकेने भारताला ठेंगा दाखवल्याची शंका उपस्थित होत आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या 75 दहशतवाद्यांच्या यादीत बंदी घातलेल्या जमात उल दावा संघटनेचा म्होरक्या हाफिझ सईद याचे नाव नसल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. हाफिझ सईद हा यावर्षी जानेवारी महिन्यापासून नजरकैदेत आहे. तसेच दहशतवादी कारवायांप्रकरणी त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितले की, अमेरिकेने पाकिस्तानला 75 दहशतवाद्यांची यादी सोपवली आहे. तर पाकिस्तानने अमेरिकेला 100 दहशतवाद्यांची यादी दिली आहे. मात्र या यादीमध्ये एकही पाकिस्तानी दहशतवादी नाही.  भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत पाकिस्तानमधील दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा झाली होती.तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांनी पाकिस्तानला खडसावले होते. तसेच पाकिस्तानने दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट केल्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांची दहशतवादाविरोधातील रणनीती प्रभावी ठरणार नाही, यावरही सहमती झाली होती.   हाफिज पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आहे. भारतातील विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये तोयबाचा हात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय सुमदायाने तोयबावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला होता. या दबावानंतर समाजसेवा करत असल्याचे भासवण्यासाठी हाफिजने  जमात उल दावाची स्थापना केली. मात्र, हाफिजची ही चतुराई फार काळ टिकली नाही. अमेरिकेने 2014 मध्येच जमात उल दावालाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानUSअमेरिकाIndiaभारत