हाफिज सईदला पुन्हा अटक, अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान नरमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 06:22 IST2017-12-01T06:21:47+5:302017-12-01T06:22:10+5:30
भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने हाफिज सईद याला पुन्हा अटक केल्याचे वृत्त आहे. अर्थात, हाफिज याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते समजू शकले नाही.

हाफिज सईदला पुन्हा अटक, अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान नरमले
इस्लामाबाद : भारतासह अमेरिकेचा दबाव आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने हाफिज सईद याला पुन्हा अटक केल्याचे वृत्त आहे. अर्थात, हाफिज याला कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे ते समजू शकले नाही.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमाद-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या सुटकेनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर, हाफिजच्या सुटकेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही अतिशय वाईट संदेश गेल्याचे अमेरिकेने म्हटले होते. दहशतवादाशी लढण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पाकिस्तानातील न्यायालयाने गेल्या आठवड्यात हाफिज याला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश दिले होते.
पाक न्यायालयाने गेल्या आठवड्यात हाफिजला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कन्या व सल्लागार इव्हांका ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेचे परिणाम लवकरच दिसतील आणि अमेरिकेचा पाकिस्तानवर दबाव वाढेल, असे सरकारच्या वतीने बुधवारीच सांगण्यात आले होते. (वृत्तसंस्था)