कॅलिफोर्नियात पाच जणांची हत्या करुन हल्लेखोराची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 10:26 AM2018-09-13T10:26:31+5:302018-09-13T10:28:28+5:30

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये असलेलल्या बॅकर्सफिल्ड परिसरात एका बंदुकधारी व्यक्तीने पाच जणांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली. 

Gunman kills 5, self in Southern California | कॅलिफोर्नियात पाच जणांची हत्या करुन हल्लेखोराची आत्महत्या

कॅलिफोर्नियात पाच जणांची हत्या करुन हल्लेखोराची आत्महत्या

Next

बॅकर्सफिल्ड : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये असलेलल्या बॅकर्सफिल्ड परिसरात एका बंदुकधारी व्यक्तीने पाच जणांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी बॅकर्सफिल्डमधील बियर माऊंटेडच्या पाठिमागे असलेल्या ट्रकिंग बिझनेसमध्ये ही घटना घडली. या ठिकाणी हल्लेखोर आपल्या पत्नीसमवेत आला असता त्याने गोळीबार सुरु केला. या गोळीबारात त्याच्या पत्नीसह पाच जणांचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समजते. 


येथील कर्न कॉउंटी शेरिफ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला घेराव घातला. त्यावेळी हल्लेखोराला पळ काढता आली नाही म्हणून त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, या हल्लेखोराची अद्याप ओळख पटली नसून पोलीस याबाबत तपास करत आहेत. 
 

Web Title: Gunman kills 5, self in Southern California

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.