नायजेरियामध्ये वऱ्हाडींची होडी बुडाली; 100 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 08:54 IST2023-06-14T08:53:52+5:302023-06-14T08:54:28+5:30
पोलीस प्रवक्ता ओकासनमी अजयायी यांनी सांगितले की, नायजर नदीमध्ये ही दुर्घटना घडली आहे.

नायजेरियामध्ये वऱ्हाडींची होडी बुडाली; 100 जणांचा मृत्यू
अबुजा: नायजेरियामध्ये मंगळवारी भीषण घटना घडली आहे. होडी उलटल्याने जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हे लोक एका लग्न समारंभाला गेले होते, तिथून माघारी येत असताना हा अपघात घडला आहे.
पोलीस प्रवक्ता ओकासनमी अजयायी यांनी सांगितले की, नायजर नदीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. शेजारील राज्य नायजरच्या जवळ हा अपघात झाला आहे. शोध सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते. यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे.
नायजर ही नायजेरियातील सर्वात मोठी नदी आहे. या घटनेनंतर बुडालेल्या नागरिकांना पोलिस आणि स्थानिक लोकांनी शोध सुरु केला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत. नायजेरियामध्ये स्थानिक स्तरावर बांधलेल्या नौकांचा वापर केला जातो. यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असतात.