शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात मित्रांची मस्ती पडली महागात, थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला नवरदेव; वाचा काय झालं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 17:57 IST

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात उत्तर-पश्चिम रोमानियाच्या बिहोर काउंटीमध्ये घटली आहे. जेव्हा  नवरदेवाच्या मित्रांनी त्याला हवेत फेकलं.

लग्नादरम्यान नवरी-नवरदेवाचे मित्र-मैत्रिणी नेहमी मस्ती करतात. या मजा-मस्तीमुळे लग्नात एक वेगळीच रंगत येते. पण रोमानियातील एका तरूणाला मित्रांची ही मजा-मस्ती चांगलीच महागात पडली आहे. लग्नाच्या स्टेजवर नवरदेव थेट हॉस्पिटलमधील बेडवर पोहोचला आहे. नवरदेवाचा पाठीचा कणा मोडला आहे आणि सध्या त्याला काही दिवस हॉस्पिटलमद्येच रहावं लागणार आहे.

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात उत्तर-पश्चिम रोमानियाच्या बिहोर काउंटीमध्ये घटली आहे. जेव्हा नवरदेवाच्या मित्रांनी त्याला हवेत फेकलं, तेव्हा ते त्याला पकडण्यात अपयशी ठरले. झालं असं की, नवरी-नवरदेव स्टेजवरच होते. तेव्हा नवरदेवाचे काही मित्र तिथे आले. त्यांनी नवरदेवाला हवेत फेकलं. पहिल्यांदा तर त्यांनी नवरदेवाला बरोबर कॅच केलं. पण दुसऱ्यांदा ते यात अपयशी ठरले. (हे पण वाचा : बाउंसरने पैशांसाठी अब्जाधीशाच्या मुलीला बनवलं गर्लफ्रेन्ड, नंतर केली तिची हत्या; कारण...)

३१ वर्षीय नवरदेव हवेतून थेट जमिनीवर डोक्यावर आपटला. त्यानंतर आनंदाच्या वातावरणात दुख:चं सावट पसरलं. मित्र लगेच नवरदेवाला हॉस्पिटलमद्ये घेऊन गेले. इथे डॉक्टरांनी सांगितलं की, त्याचा पाठीचा कणा मोडला. त्याला काही दिवस हॉस्पिटलमद्येच रहावं लागेल. पीडित म्हणाला की, 'लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं.  सगळेच आनंदी होते आणि तेव्हाच माझे मित्र आले. त्यांना मला हवेत फेकलं. ही त्यांची आनंद व्यक्त करण्याची पद्धत होती. पण तेव्हाच दुर्घटना घडली'.

सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे नवरदेव हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरही रिसेप्शन सुरूच होतं. नवरीसोबतच दोन्ही परिवाराचे सदस्य पूर्णवेळ रिसेप्शनमध्ये उपस्थित होते. तेच पीडित नवरदेव आता आपल्या मित्रांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. तो म्हणाला की, 'मी माझ्या वकिलाला संपर्क केला आहे. पण कळत नाहीये की, काय करावं'. 

टॅग्स :marriageलग्नAccidentअपघातInternationalआंतरराष्ट्रीय