मन शुद्धीकरणासाठी ट्रम्प यांना पाठविला ग्रीन टी!

By Admin | Updated: July 15, 2016 02:32 IST2016-07-15T02:32:19+5:302016-07-15T02:32:19+5:30

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना भारतातील एका चहा कंपनीने आसाम ग्रीन टीच्या चक्क ६ हजार बॅगा पाठविल्या आहेत

Green tea was sent to Trump for cleansing of mind | मन शुद्धीकरणासाठी ट्रम्प यांना पाठविला ग्रीन टी!

मन शुद्धीकरणासाठी ट्रम्प यांना पाठविला ग्रीन टी!

वॉशिंग्टन : अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना भारतातील एका चहा कंपनीने आसाम ग्रीन टीच्या चक्क ६ हजार बॅगा पाठविल्या आहेत. कारण काय तर यामुळे शरीर आणि मनाचे शुद्धीकरण होते. स्वत:ला शुद्ध बनविण्यासाठी अजून वेळ गेलेली नाही, असा संदेशही कंपनीने त्यातून दिला आहे.
कोलकातास्थित टी-ए-मी टीज या कंपनीने एका व्हिडीओत म्हटले आहे की, ट्रम्प महोदय, नमस्कार. आम्ही आपल्याला हा ग्रीन टी पाठवित आहोत. हा चहा हानिकारक तत्त्वांशी लढतो तसेच मन व शरीराला शुद्ध करतो. आपल्यासाठी, अमेरिकेसाठी आणि जगासाठी कृपया हा चहा घ्या. चहाच्या बॅग्ज न्यू यॉर्कस्थित ट्रम्प टॉवर येथे पाठविण्यात आल्या आहेत.
व्हिडीओत म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विधानांनी जगाला काळजीत टाकले आहे. आम्ही त्यांना रोखू शकत नाही. पण, त्यांचे मन व मतपरिवर्तन करू शकतो. कंपनीचे मुख्य संचालक सुमित शाह म्हणाले की, या चहाचा आरोग्यावरील प्रभाव अतिशय गुणकारी आहे. हा चहा ट्रम्प यांच्यासाठी चांगला आहेच; पण, याचा देशाला व जगाला लाभ होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Green tea was sent to Trump for cleansing of mind