महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना 2 दिवसांसाठी भारत दौ-यावर

By Admin | Updated: May 3, 2017 21:37 IST2017-05-03T21:37:00+5:302017-05-03T21:37:00+5:30

17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकप अंतिम सामन्याच्या एक महिनाआधी ते भारतात येणार आहेत.

Great footballer Diego Maradona on a two-day tour of India | महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना 2 दिवसांसाठी भारत दौ-यावर

महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना 2 दिवसांसाठी भारत दौ-यावर

>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 3 - अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना भारतात येणार आहेत.  दोन दिवसांसाठी 18 आणि 19 सप्टेंबर रोजी मॅरेडोना कोलकाता येथे येणार आहे. म्हणजे 17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकप अंतिम सामन्याच्या एक महिनाआधी ते भारतात येणार आहेत. 1986 च्या वर्ल्डकपचा नायक दुस-यांदा कोलकातामध्ये येणार आहे. यापुर्वी ते 2008 कोलकाता येथे आले होते त्यावेळी त्यांची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर झुंबड उडाली होती. 
 
19 सप्टेंबर रोजी मॅरेडोना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत एक सामना देखील खेळणार आहे. या सामन्यात अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होणार असल्याचं वृत्त आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मॅरेडोना यांचा सन्मान करणार आहेत.  
 
10 वर्षांनंतर पश्चिम बंगालच्या दौ-यामुळे मॅरेडोना आनंदी असून ही सन्मानाची बाब आहे, कोलकातासोबत आठवणी जोडल्या असून तेथील चाहते आणि कोलकाता खास आहेत अशी प्रतिक्रिया मॅरेडोना यांनी दिल्याचं त्यांच्या या दौ-याच्या आयोजकांनी सांगितलं.   
 

Web Title: Great footballer Diego Maradona on a two-day tour of India