शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

अंटार्क्टिका समुद्रात हिमनगाला मोठा तडा, पाणी पातळी 25 इंचानी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 11:07 IST

अंटार्क्टिका समुद्रात हा हिमनग वितळल्यास जगभरातील समुद्रातील पाण्याची पातळी 25 इंचांनी वाढणार आहे, अशा स्थितीत मुंबईसह जगाच्या किनारपट्टीवरील शहरांचे अनेक भाग पाण्याखाली जाऊ शकतात

ठळक मुद्देग्लेशियरमध्ये हिमनगाला तडा गेल्या अनेक मोठ्या आणि तिरक्या दरार पडल्या आहेत. जर पाण्यात तरंगणाऱ्या बर्फाचा हिमनग कोसळला, तर थ्वेट्स ग्लेशियरमुळे जागतिक पातळीवर समुद्र पाण्याच्या पातळीत 25 टक्क्यांची वाढ होईल

वॉशिंग्टन - जमिनीवरील महाकाय पाण्याचा स्त्रोत असलेल्या अंटार्टिका समुद्रातील हिमनगाला तडा गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंटार्क्टिकाच्या डूम्सडे ग्लेशियरवर (Antarctic’s doomsday glacier) मोठा धोका निर्माण झाला आहे. थ्वेट्स ग्लेशियरमध्ये (Thwaites Glacier) एक लांबलचक तडा गेल्याचे दिसून आले आहे. हा ग्लेशियर 170,312 किमी लांब आहे, जो अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याच्या विस्तीर्णाएवढा आहे. येत्या 5 वर्षांत हा हिमनग तुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

अंटार्क्टिका समुद्रात हा हिमनग वितळल्यास जगभरातील समुद्रातील पाण्याची पातळी 25 इंचांनी वाढणार आहे, अशा स्थितीत मुंबईसह जगाच्या किनारपट्टीवरील शहरांचे अनेक भाग पाण्याखाली जाऊ शकतात. या थ्वेट्स ग्लेशियरवर पडलेल्या भेगा गतीमान असून जागतिक पातळीवरील समुद्राच्या वाढीव पाण्याच्या 4 पट हे पाणी असेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. समुद्रातील गरम होत असलेलं पाणी थ्वेट्स ग्लेशियरच्या घनतेला तडा देत असल्याचे सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांवरुन दिसून येते. अमेरिकन जिओफिजिकल यूनि‍यनच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 

जागतीक पातळीवर 25 टक्क्यांची जलस्तर वाढ

हिमनगाला तडा गेल्याने अनेक मोठ्या आणि तिरक्या भेगा पडल्या आहेत. जर पाण्यात तरंगणाऱ्या बर्फाचा हिमनग कोसळला, तर थ्वेट्स ग्लेशियरमुळे जागतिक पातळीवर समुद्र पाण्याच्या पातळीत 25 टक्क्यांची वाढ होईल, असे संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे. प्राध्यापक स्टेड काबोस यांनी म्हटले की, ग्लेशियरच्या प्रभावाचा 1 दशकांपेक्षाही अधिकचा बदल होईल. त्यामुळे, अनेक नवसंशोधन यातून समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका संशोधनानुसार 1980 च्या दशकापासून आत्तापर्यंत कमीत कमी 600 अब्ज टन बर्फ नष्ट झाला आहे. 

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गWaterपाणी