शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

सलाइनऐवजी फॉर्र्मालिन दिल्याने महिला मृत, एक-एक अवयव निकामी होत गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:02 AM

रसियाच्या व्होल्गा प्रांतातील उल्यानोवस्क शहरात नियमित शस्त्रक्रिया करताना इस्पितळातील कर्मचाऱ्यांनी नसेतून सलाइन देण्याऐवजी मृतदेह सडू नये, म्हणून वापरतात ते फॉर्मालिन हे अत्यंत विषारी द्रव टोचल्याने एका २८ वर्षांच्या महिलेचा अत्यंत करुण अंत झाला.

उल्यानोवस्क (रशिया) : रसियाच्या व्होल्गा प्रांतातील उल्यानोवस्क शहरात नियमित शस्त्रक्रिया करताना इस्पितळातील कर्मचाऱ्यांनी नसेतून सलाइन देण्याऐवजी मृतदेह सडू नये, म्हणून वापरतात ते फॉर्मालिन हे अत्यंत विषारी द्रव टोचल्याने एका २८ वर्षांच्या महिलेचा अत्यंत करुण अंत झाला.‘तास’ या रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इकातेरिना फ्येदारेवा या महिलेस बिजांड कोशात झालेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी इस्पितळात दाखल केले गेले होते. सलाइनऐवजी तिला फॉर्मालिन हे द्रव नसेतून देण्यात येत असल्याची चूक अवघ्या पाच मिनिटांत डॉक्टरांच्या लक्षात आली. लगेच ते बंद करण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. फॉर्मालिनमधील फॉर्मलडिहाइड हे द्रव्य एवढे विषारी असते की, मृत्यू होण्यास ते एक औंस शरीरात गेले, तरी पुरेसे होते.नसेतून हे विष शरीरात जाऊ लागताच इकातेरिना हिने उशाशी बसलेल्या आईला ‘मॉम मी आता काही वाचत नाही,’ असे खोल गेलेल्या आवाजात सांगितले, परंतु वेदना होत असल्याने ती तसे म्हणत असावी, असे आईला वाटले. हे जहाल विष जसजसे इकातेरिनाच्या शरीरात भिनत गेले, तसे तिचे एक एक अवयव निकामी होत गेले. विष उतरविण्यासाठी डॉक्टरांनी तिला आणखी ५० औषधे टोचली. केस हाताबाहेर जात आहे हे दिसल्यावर तिला तातडीने मॉस्कोला हलविण्यात आले, पण इकातेरिना वाचू शकली नाही. (वृत्तसंस्था)परिचारिकेची चूकव्होल्गा प्रांताचे आरोग्यमंत्री रशिद अब्दुल्लोह यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि मृताच्या कुटुंबीयांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे जाहीर केले. सलाइन म्हणून लावण्यासाठी परिचारिकेने जी बाटली घेतली, त्यावरील नाव नीट न वाचल्याने हा प्राणघातक घोळ झाला, असे ते म्हणाले. संबंधित इस्पितळाच्या मुख्य डॉक्टरला तात्काळ बडतर्फ करण्यात आले असून, इतरांवर फौजदारी खटला दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :russiaरशिया