शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी द्या हो.. 25 देशांवर येणार भीषण संकट; १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 13:35 IST

आफ्रिकी देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क, वॉशिंग्टन: जगभरातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहत असलेले तब्बल २५ देश गंभीर पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या एक्वाडस्ट वॉटर रिस्क ॲटलसमध्ये हे चित्र समोर आले आहे. टंचाईचा सामना करीत असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक २४ व्या स्थानी आहे. जगभरातील निम्म्या लोकसंख्येला म्हणजेच सुमारे ४०० कोटी लोकांना दरवर्षी किमान महिनाभरासाठी टंचाईला सामोरे जावे लागते. जागतिक स्तरावर विचार केला तर १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे.

आफ्रिकी देशांमध्ये स्थिती अधिक गंभीर

  • ज्या देशांमध्ये नागरिक उपलब्ध पाण्याचा जवळपास पूर्णपणे वापर करतात तिथे पाण्याची अत्यंतिक चणचण आहे असे म्हटले जाते. या स्थितीत कमी दुष्काळ आला तरी गंभीर स्थिती उद्भवू शकते.
  • मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत स्थिती गंभीर आहे. या भागात ८३ टक्के लोकसंख्येला पाण्याची चणचण जाणवते आहे. दक्षिण आशियामध्ये ७४ टक्के लोकसंख्येला गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

भारताच्या जीडीपीवर परिणाम 

जगभरातील जवळपास ६० टक्के लोकसंख्येला २०५० पर्यंत वर्षभरातून एका महिनाभरासाठी पाण्याच्या गंभीर टंचाईचा सामना करावा लागणार आहे. २०५० मध्ये भारत, मेक्सिको, इजिप्त आणि तुर्कस्तान या चार देशांच्या निम्म्याहून अधिक जीडीपीचे नुकसान केवळ पाण्याच्या कमतरतेमुळे होणार आहे.

खाद्यसुरक्षेवरही संकट

पाण्याच्या टंचाईमुळे देशातील औद्योगिक उत्पादनाला मोठा फटका बसतो. वीजनिर्मितीही घटते. शेती उत्पादनांवर गंभीर परिणाम होतो. पाणीटंचाईमुळे जगासमोर खाद्यसुरक्षेचे संकट उभे राहिले आहे. जगभरातील ऊस, गहू, तांदूळ आणि मका उत्पादक पाणीटंचाईमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या १० अब्जावर पोहोचण्याचा अंदाज आहे. इतक्या लोकसंख्येला पुरेल इतके अन्नधान्य पिकवावे लागणार आहे. यासाठी २०१० तुलनेत अन्नधान्याचे उत्पादन जवळपास ५६ टक्क्यांनी वाढवावे लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी