4 मुलांना जन्म द्या अन् 32 लाख मिळवा...'या' देशाने आपल्या नागरिकांना दिली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 22:15 IST2024-12-27T22:03:10+5:302024-12-27T22:15:52+5:30
अनेक देश लोकसंख्येमुळे चिंतेत आहेत.

4 मुलांना जन्म द्या अन् 32 लाख मिळवा...'या' देशाने आपल्या नागरिकांना दिली ऑफर
Popullation News : जपानपासून चीनपर्यंत...अनेक देशांचा जन्मदर झपाट्याने घसरत आहे. वृद्धांची लोकसंख्या वाढत असून, तरुणांच्या कमतरतेमुळे विविध क्षेत्रातील कामावर परिणा पडत आहे. हे देश तरुणांना मूल जन्माला घालण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा देण्यासोबतच पैसेही वाटले जात आहेत. याशिवाय, मुलींना शहरातून खेड्यात पाठवले जात आहे. अशातच, रशियातील एका राज्याने तर आपल्या नागरिकांना एक अनोखी ऑफर दिली आहे.
पश्चिम रशियाच्या निझनी नोव्हगोरोड ओब्लास्ट प्रांताने तरुणांना प्रत्येकी 4 मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. सरकार प्रत्येक मुलाला 10 लाख रूबल, म्हणजेच आठ लाख रुपये देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. रशियाच्या निझनी नोव्हगोरोड ओब्लास्ट प्रांताचे गव्हर्नर ग्लेब निकितिन यांनी या ऑफरची घोषणा केली असून, हे इन्स्टिट्यूट फॉर वॉर स्टडीजच्या अहवालात प्रसिद्ध झाले आहे.
रशियामध्ये जन्मदर खूप कमी आहे. सध्या येथे जन्मदर प्रति स्त्री 1.5 मुले आहे, परंतु सरकारचे मत आहे की, हा फार कमी आहे. सध्याची लोकसंख्या कायम ठेवायची असेल, तर प्रति स्त्री जन्मदर 2.1 बालकांचा असावा. ती कायम ठेवण्यासाठी सरकारने यापूर्वीच विविध सवलती दिल्या आहेत.
रशिया दोन वर्षांपासून युक्रेनसोबतच्या युद्धात अडकला आहे. युद्धात अनेक जवान जवान शहीद झाले आहेत. यामुळे रशियाची लोकसंख्या झपाट्याने घटली आहे. अहवालानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये रशियाची लोकसंख्या गेल्या 25 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे. हे पाहून सरकार तणावात आहे. रशिया ज्या परिस्थितीतून जात आहे, ते पाहता त्याला लष्करी बळाची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारने ऑफर देण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे ऑफर ?
या अहवालानुसार पहिल्या आणि दुसऱ्या मुलासाठी केंद्र सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत. तर तिसऱ्या आणि चौथ्या मुलासाठी राज्य सरकार पैसे देणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, यासाठी कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. ही ऑफर 18 ते 23 वयोगटातील मुलींसाठी देण्यात आली आहे. याअंतर्गत रशियाची राजधानी मॉस्को येथेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.