धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:47 IST2025-12-16T19:23:20+5:302025-12-16T19:47:48+5:30
अमेरिकेतील एक मोठं विमानतळावर भुताटकी असल्याचा दावा करण्यात येत आहे. तिथे एक रहस्यमय सावली असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
विमानतळावर नेहमी प्रवाशांची मोठी गर्दी असते, यासह विमानतळ परिसरात मोठा सुरक्षा एजन्सीचा मोठा बंदोबस्त असतो. यामुळे विमानतळ एक सुरक्षित जागा मानली जाते. पण, अमेरिकेतील एका विमानतळाला भुताटकीची जागा असल्याचे मानले जाते.
हे विमानतळ अमेरिकेतील हवाई येथे स्थित आहे. हवाई हे आपल्या नयनरम्य निसर्गदृश्य आणि शांत वातावरणासाठी अमेरिकेतील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. मात्र, अनेक वर्षांपासून अशी अफवा पसरलेली आहे की येथील मुख्य विमानतळावर एक आत्मा वास करत आहे.
लोक हवाईतील होनोलुलु येथील मुख्य विमानतळावर सावली पाहिल्याचा दावा करतात. कोणीतरी विमानतळावर झोपलेल्या प्रवाशांचा गळा दाबते आणि बाथरूममधील टॉयलेट पेपर फाडतो,असा दावा अनेकांनी केला आहे.
झोपलेला प्रवाशांना होतोय त्रास
लोकांनी अनेकदा एक सावली पाहिली आहे, ही सावली एका महिलेची असल्याचे मानले जाते. ती सावली पांढरे कपडे घातलेली एक गोरी स्त्री आहे, ती इकडे तिकडे फिरत असते. ती अशा ठिकाणी दिसते तिथे बहुतेक लोकांना जाण्याची परवानगी नाही. ती बाथरूममध्ये, टॉयलेट फ्लश करताना किंवा टॉयलेट पेपर उघडताना त्रास देते.
होनोलुलु विमानतळावरही आत्मा असल्याचा दावा
HauntedPlaces.org नुसार, भूत शोधणाऱ्यांचा असा विश्वास आहे की ती महिला एका पुरूषाच्या प्रेमात पडली.त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. पण सर्व काही नियोजित प्रमाणे झाले नाही आणि तो पुरूष आंतरराष्ट्रीय विमानात चढला आणि परतलाच नाही.
त्या महिलेने आत्महत्या केली. तेव्हापासून तिचा आत्मा अजूनही तिच्या प्रियकराची वाट पाहत असल्याचा दावा केला जात आहे. कोणीतरी छातीवर बसून गुदमरल्यासारखे वाटले, असा दावा प्रवाशांनी केला आहे. यामुळे त्या भूताला "गुदमरणारा भूत" असे टोपणनाव देण्यात आले आहे.