गतवर्षी बांगलादेशमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शेख हसिना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. दरम्यान, या सत्तांतरानंतर बांगलादेशात कट्टरतावाद्यांचं प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. तसेच पाकिस्तान समर्थक कट्टरतावादी संघटना असलेल्या जमात ए इस्लामीकडून सातत्याने भारताविरोधात गरळ ओकली जात आहे. दरम्यान, जमात ए इस्लामीचा डेप्युटी असलेल्या अमीर सय्यद अब्दुल्ला मोहम्मद ताहिर याने आपले ५० लाख हल्लेखोर गझवा-ए-हिंदसाठी तयार आहेत, असा धक्कादायक दावा केला आहे.
जमात ए इस्लामीचा डेप्युटी असेल्या अमीर सय्यद अब्दुल्ला मोहम्मद ताहिर याने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे बांगलादेश-अमेरिकन असोशिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारताविरोधात गरळ ओकत जझवा-ए-हिंदसाठीची योजना जाहीर केली आहे. गझवा-ए-हिंदसाठीच्या लढ्यात ५० लाख हल्लेखोर सहभागी होतील आणि ते छुप्या युद्धाच्या रणनीतीने लढतील, असा दावाही ताहीर याने केला आहे.
ताहीर म्हणाला की, आमचा हेतू १९७१ च्या युद्धात जमात ए इस्लामीवर पाकिस्तानला मदत केल्याने लागलेला कलंक धुवून काढणे हा आहे. काही जण सांगतात की, जमान ए इस्लामी सत्तेत आली तर भारतावर हल्ला होईल. मी दुवा करतो की, त्यांनी हल्ला करावा, ज्यामुळे आमच्यावर १९७१ मध्ये लागलेला कलंक धुवून निघेल. त्यामधून आम्हाला खरे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे सिद्ध करण्याची संधी मिळेल.
आमचे ५० लाख हल्लेखोर सज्ज आहेत. त्यांना दोन गटांमध्ये विभागलं जाईल, यामधील एक गट छुप्या युद्धात सहभागी होईल. तर दुरसा गट भारताच्या एका मोठ्या भागात घुसून प्रतिकार करेल, असा दावाही ताहीर याने केला.
Web Summary : A Jamaat-e-Islami leader claims 5 million attackers are ready for 'Ghazwa-e-Hind', planning a covert war against India to erase the stain of aiding Pakistan in 1971.
Web Summary : जमात-ए-इस्लामी के एक नेता ने दावा किया कि 'गज़वा-ए-हिंद' के लिए 50 लाख हमलावर तैयार हैं, जो 1971 में पाकिस्तान की सहायता करने के दाग को मिटाने के लिए भारत के खिलाफ एक गुप्त युद्ध की योजना बना रहे हैं।