'ओलिसांना सोडले नाही तर नरकात जाण्यास तयार रहा'; डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 07:57 IST2025-03-06T07:55:29+5:302025-03-06T07:57:11+5:30
इस्रायलमध्ये पकडलेल्या आणि गाझामध्ये ठेवण्यात आलेल्या अमेरिकन ओलिसांची सुटका करण्यासाठी ट्रम्प प्रशासन पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासशी गुप्त चर्चा करत आहे.

'ओलिसांना सोडले नाही तर नरकात जाण्यास तयार रहा'; डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमाससोबत गुप्त चर्चा केली आहे. ही चर्चा गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या अमेरिकन नागरिकांना सोडण्याबाबत आहे. काही दिवसापूर्वी कतारची राजधानी दोहा येथे अमेरिकेचे विशेष दूत अॅडम बोहेलर यांनी हमासशी थेट चर्चा केली. यापूर्वी अमेरिकेने या इस्लामिक गटाशी थेट संपर्क टाळला होता.
ट्रम्प यांची ठिणगी; जगात पुन्हा व्यापारयुद्ध पेटणार?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासच्या दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासच्या दहशतवाद्यांना गाझामध्ये असलेल्या सर्व ओलिसांना तात्काळ सोडण्यास सांगितले आणि ओलिसांना लवकरात लवकर सोडण्याचा अंतिम इशारा दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली, यात त्यांनी हा शेवटचा इशारा असल्याचे म्हटले आहे. नेतृत्वाला, आता संधी असताना गाझा सोडण्याची वेळ आली आहे. तसेच, गाझाच्या लोकांना एक सुंदर भविष्य वाट पाहत आहे, परंतु जर तुम्ही ओलिस ठेवले असेल तर नाही. जर तुम्ही असे केले असेल तर तुम्ही मरणार. जर ओलिसांना सोडले नाही तर त्रास सहन करण्यास आणि नरकात जाण्यास तयार राहा, असंही ट्रम्प म्हणाले.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने दक्षिण इस्रायलमध्ये सीमापार हल्ला केला, यामुळे विनाशकारी गाझा युद्ध सुरू झाले.
१९९७ मध्ये दहशतवादी संघटना जाहीर
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने १९९७ मध्ये हमासला दहशतवादी संघटना घोषित केले. गाझा संघर्षात युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्यात अमेरिकेची पूर्वीची भूमिका इस्रायल आणि कतार आणि इजिप्तमधील मध्यस्थांसोबत काम करण्याची होती, पण वॉशिंग्टन आणि हमास यांच्यात थेट चर्चा झालेली नाही.