शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 00:02 IST

लेखक म्हणाले, या दुर्घटनेनंतर आपण पदावर राहू शकत नाही आणि त्यांनी नैतिक आधारावर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी, आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात कल्पना दिली होती.

नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी, सोमवारच्या हिंसक निदर्शनांमध्ये झालेल्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संयंकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लेखक यांनी, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला, असे बैठकीत उपस्थित असलेल्या एका मंत्र्यांनी सांगितले. जनरेशन-झेडच्या निदर्शकांनी सोमवारी केलेल्या निदर्शन हिंसक बनले असून आतापर्यंत किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

काय म्हणाले लेखक? -लेखक म्हणाले, या दुर्घटनेनंतर आपण पदावर राहू शकत नाही आणि त्यांनी नैतिक आधारावर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी, आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात कल्पना दिली होती.

काठमांडूची परिस्थिती नियंत्रणाबाहेर -नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये या निदर्शनाचा सर्वाधिक परिणाम झाला. स्थानिक प्रशासनाने चार महत्त्वाच्या भागात कर्फ्यू लागू केला आहे. यात शितल निवास (राष्ट्रपती कार्यालय), महाराजगंज परिसर, ग्रीन हाऊस (उपराष्ट्रपती कार्यालय), लैनचौर परिसर, रायणहिटी दरबार संग्रहालय परिसर आणि सिंह दरबार परिसर यांचा समावेश आहे. कर्फ्यू दरम्यान, कोणत्याही व्यक्तीला फिरण्याचा, सभा घेण्याचा,ने मिरवणूक काढण्याचा अथवा निषेध करण्याचा अधिकार नाही. रात्री १० वाजेपर्यंत या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काठमांडूमध्ये लागू केलेल्या या कर्फ्यूचा उद्देश परिस्थिती नियंत्रित करणे आणि सुरक्षा राखणे असल्याचे सांगितले जात आहे....म्हणून नेपाळमध्ये लोक उतरले रस्त्यावर -नेपाळमधील या आंदोलनामागचं मुख्य कारण म्हणजे, सोशल मीडियावर लादलेली बंदी. हजारो तरूण नेपाळच्या रस्त्यांवर उतरले आहेत. हे लोक भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात निदर्शने करत आहेत. नेपाळमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि स्नॅपचॅटवर बंदी घालण्यात आल्याने या तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. हे आंदोलनकर्ते हिंसक झाल्यानंतर रस्त्यावर पोलिसांसह सैन्यानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे आंदोलन हिंसक बनले असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. 

टॅग्स :NepalनेपाळagitationआंदोलनHome Ministryगृह मंत्रालयSocial Mediaसोशल मीडिया