शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानात खेळ खल्लास, की आणखीही काही शिल्लक? अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 00:54 IST

अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर, आता अमेरिका कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

काबुल - तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर आणि राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर, विविध प्रकारचे कयास लावले जात आहेत. दरम्यान, अमेरिका आपले आणखी 1000 सैनिकअफगाणिस्तानात पाठवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातच, जागतिक स्तरावर टीकेचे लक्ष बनलेले अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आज रात्री उशिरा अफगानिस्तान-तालिबान मुद्यावर निवेदन देणार आहेत. (The game in Afghanistan is over, or something else, America taken big decision!)

दुसरीकडे, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई आणि तालिबानसोबत शांततेसंदर्भात चर्चा करणाऱ्या गटाचे प्रमुख अब्दुला-अब्दुल्ला हेही सातत्याने तालिबानच्या संपर्कात आहेत. अफगाणिस्तानातील लोकशाही सरकारशी संबंधित असलेले हे दोन्ही नेते काबूलमध्ये आहेत. अशी स्थिती असताना, आता अफगाणिस्तानात नेमके काय होणार? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Afghanistan Crisis: तालिबान सरकारसोबत मैत्रीसाठी चीन तैय्यार, या 4 देशांचं समर्थन मिळणार

अमेरिका 1000 अतिरिक्त सैनिक पाठवणार - अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर, आता अमेरिका कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, की "जर कोणत्याही कारवाईमुळे आमच्या मिशनला अथवा आमच्या जवानांना हानी पोहोचली, तर आम्ही त्वरित आणि प्रभावी लष्करी कारवाई करू," असे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने आणखी 1000 सैनिक अफगाणिस्तानात पाठवण्याची तयारी केली आहे. तर, सुमारे 5000 अमेरिकन सैनिक आधीच अफगाणिस्तानमध्ये तैनात आहेत. तसेच, अमेरिकन सैन्यातील एक वरिष्ठ कमांडर आज दोहा येथे तालिबानच्या नेत्यांना भेटले.

'भारत भूमिका बदलेल आणि आमची साथ देईल अशी आशा', तालिबान प्रवक्त्याचं मोठं विधान

अफगानिस्तानच्या मुद्द्यावर बायडेन देणार निवेदन - अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून ज्यो बायडेन यांना लक्ष केले जात आहे. ते आज अफगाणिस्तानच्या ताज्या परिस्थितीवर निवेदन देत आहेत. तसेच, ते अफगानिस्तानसंदर्भात अमेरिकेच्या भविष्यातील धोरणांसंदर्भातही भाष्य करतील, असा कयास लावला जात आहे. आजच्या पत्रकार परिषदेत तालिबानचा कट्टार शत्रू असलेली अमेरिका,  त्यांच्या शासनाला मान्यता देणार की नाही, हे पाहणे महत्वाचे आहे. एवढेच नाही, तर सध्या अफगाणिस्तानात असलेले अमेरिक सैनिक आता कुठले मिशण पार पाडणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

टॅग्स :AmericaअमेरिकाAfghanistanअफगाणिस्तानUSअमेरिकाSoldierसैनिक