शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दाेन दिवस संपूर्ण शटडाउन! शाळा, बँका, ऑफिस बंद राहणार; इराणमध्ये पारा ५१ अंशांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 06:55 IST

इराणमधील तापमान ५१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.

तेहरान : कडक उन्हामुळे इराणमध्ये प्रथमच दाेन दिवसांचा संपूर्ण बंद जाहीर करण्यात आला आहे. इराण सरकारने सर्व कार्यालये, शाळा आणि बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. इराणमधील तापमान ५१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.सरकारचे प्रवक्ते अली बहादुरी-जहरोमी म्हणाले की, सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सिस्तान- बलुचिस्तानमध्ये वाढत्या तापमान आणि धुळीच्या वादळामुळे अलीकडेच जवळपास १,००० लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, इराणमधील विजेचा वापर यावर्षी विक्रमी पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. लोक उष्णतेमुळे एसीचा वापर वाढवत आहेत. विजेचा वापर वाढल्याने अनेक ठिकाण वीजकपातही करण्यात येत आहे. 

इतर देशातही वीज कपात- गेल्या वर्षी तापमानवाढीपासून वाचण्यासाठी इराकने नागरिकांना सुट्टी जाहीर केली होती. - तर रशियानेही तापमानवाढ आणि विजेचा वाढता वापर यामुळे दिवसात किमान एकदा तरी वीज कपात होत आहे. 

जगभरात काय घडतेय? अलीकडच्या काही महिन्यांत, भारत, मेक्सिको आणि फिलीपिन्समधील शाळांनी मुलांना घरी पाठवले. अनेक देशात शिकवण्याचे तास बदलले आहेत. ग्रीसमध्ये दुपारी कामावर येण्यास निर्बंध आहेत.

- ६.५ अब्जाहून अधिक लोक किंवा जगभरातील एकून लोकसंख्येच्या ८१ टक्के लोकांना जुलैमधील वाढत्या तापमानाचा फटका बसला आहे.- २.४ ट्रिलियन डॉलरपर्यंतचे आर्थिक नुकसान उष्णतेमुळे होईल.

...तर अनेकांचे जीव जातीलजोपर्यंत देश जीवाश्म इंधन जाळणे कमी करत नाहीत तसेच पायाभूत सुविधांना बळकटी देत नाहीत तोपर्यंत जगभरात उष्णतेमुळे अनेक जीव जातील शिवाय अनेकांचा रोजगार जाईल. 

टॅग्स :IranइराणTemperatureतापमानSchoolशाळाbankबँक