फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:39 IST2025-09-19T12:39:12+5:302025-09-19T12:39:43+5:30

इमॅन्युएल मॅक्रो यांची पत्नी ब्रिजिट ही तृतीयपंथी असल्याचे दावे केले जात आहेत. यावरून आता फ्रान्सच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

French President imanual macron's wife transgender, Brizita not a woman but a man, while she was a teenager...; Claim creates stir | फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ

फ्रान्समध्ये सध्या मोठे आंदोलन सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना विमानाच्या दरवाजावर कानशिलात वाजविणाऱ्या त्यांच्या पत्नीबाबत मोठा दावा केला जात आहे. इमॅन्युएल मॅक्रो यांची पत्नी ब्रिजिट ही तृतीयपंथी असल्याचे दावे केले जात आहेत. यावरून आता फ्रान्सच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

मॅक्रो यांची पत्नी ही महिला नसून ती ट्रांसजेंडर असल्याचा दावा अमेरिकेतील अति-उजव्या विचारसरणीच्या प्रभावशाली आणि राजकीय समालोचक कॅन्डेस ओवेन्स यांनी केला आहे. यावर मॅक्रो यांची प्रतिक्रिया आली आहे. मॅक्रो यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच जुलैमध्ये ओवेन्सविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. आता मॅक्रो आणि त्यांच्या पत्नीने महिला असल्याचे पुरावे लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे. 

फ्रेंच फर्स्ट लेडी ट्रान्सजेंडर असल्याचा आरोप पहिल्यांदा फ्रेंच ब्लॉगर्स अमांडिन रॉय आणि नताशा रे यांनी एका यूट्यूब व्हिडिओमध्ये केला होता. हा दावा २०२१ मधील होता. मॅक्रो यांनी २०२४ मध्ये त्यांच्याविरुद्धचा मानहानीचा दावा जिंकला होता. २०२५ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत अपील दाखल करण्यात आले आणि त्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. आता पुन्हा अमेरिकी राजकीय समालोचकाने तोच दावा केला आहे. 

ओवेन्सने फ्रेंच फर्स्ट लेडी जन्मतःच पुरुष होती, असा दावा केला आहे. तसेच हा आरोप खोटा ठरविण्यासाठी ती तिची संपूर्ण कारकीर्द पणाला लावेल, असाही दावा केला होता. मॅक्रॉनची पत्नी ब्रिजिट जन्मतःच पुरुष होती आणि तिचे नाव जीन-मिशेल ट्रोग्नियू असे होते. ट्रोग्नियूने किशोरावस्थेत असताना मॅक्रॉनला मानसिक आधार दिला होता, असे त्याने म्हटले आहे. मॅक्रो आता हे आरोप खोडून काढण्यासाठी छायाचित्रे आणि वैज्ञानिक पुरावे सादर करण्याची तयारी करत आहेत. 

Web Title: French President imanual macron's wife transgender, Brizita not a woman but a man, while she was a teenager...; Claim creates stir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.