इसिसमध्ये घुसून फ्रान्सच्या पत्रकाराने बनविला व्हिडीओ

By Admin | Updated: May 3, 2016 01:28 IST2016-05-03T01:28:01+5:302016-05-03T01:28:01+5:30

इसिसमध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या मनात नेमके काय चालू आहे? यासह अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी फ्रान्सचा एक पत्रकार चक्क इसिसच्या या समूहातच घुसला.

French journalist intruded into it | इसिसमध्ये घुसून फ्रान्सच्या पत्रकाराने बनविला व्हिडीओ

इसिसमध्ये घुसून फ्रान्सच्या पत्रकाराने बनविला व्हिडीओ

पॅरिस : इसिसमध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या मनात नेमके काय चालू आहे? यासह अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी फ्रान्सचा एक पत्रकार चक्क इसिसच्या या समूहातच घुसला. एवढेच काय पण त्याने या घटनांवरचा एक व्हिडिओही तयार केला आहे.
हा पत्रकार सईद रामजी नावाने इसिसच्या या समूहात सहभागी झाला. ‘अल्लाहज् सोल्जर्सह्ण नावाने त्याने ही डॉक्युमेन्ट्री बनविली आहे. सोमवारी रात्री ही डॉक्युमेन्ट्री फ्रान्समध्ये दाखविण्यात येणार आहे. हा पत्रकार स्वत: मुस्लिम आहे. त्याने सांगितले की, या तरुणांच्या मनात नेमके काय चालू आहे? याचा मला शोध घ्यायचा होता. जगात काही चांगले करण्याच्या उद्देशाने येथे काहीही केले जात नाही. तर निराश झालेले व अन्य तरुण येथे आलेले मला दिसले. हे तरुण अशा काळात जन्माला आले वा त्यांची जडणघडण झाली ज्या काळात इसिसचा प्रसार होत आहे. ही दु:खद बाब आहे की, या तरुणांना काही तरी नवे हवे आहे आणि त्यांना हे काय मिळत आहे? असेही मत पत्रकाराने व्यक्त केले आहे.

Web Title: French journalist intruded into it