दोन दहशतवाद्यांना पकडण्यात फ्रान्स पोलिसांना यश
By Admin | Updated: January 9, 2015 18:20 IST2015-01-09T14:27:07+5:302015-01-09T18:20:24+5:30
चार्ली हेब्डो या मासिकावरील हल्ल्याला शुक्रवारी तिसरा दिवस पुर्ण होत असतानाच पॅरीमधील उत्तर पूर्व भागातील डे मार्टीन एन गोले या शहरातील छापखान्यात लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

दोन दहशतवाद्यांना पकडण्यात फ्रान्स पोलिसांना यश
>ऑनलाइन लोकमत
पॅरिस दि. ९ - चार्ली हेब्डो या मासिकावरील हल्ल्याला शुक्रवारी तिसरा दिवस पुर्ण होत असतानाच पॅरीमधील उत्तर पूर्व भागातील डे मार्टीन एन गोले या शहरातील छापखान्यात लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयितांचा पाठलाग करत पोलीस या ठिकाणी पोहोचले असता दहशतवादी एका छापखान्यात लपून पोलिसांवर हल्ला करत होते. हॅलिकॉप्टर व इतर यंत्रणांची मदत घेत फ्रान्समधील तब्बल ८८ हजार पोलीस यावेळी कार्यरत होते. चार्ली हेब्दो मध्ये झालेल्या हल्ल्यातील मृतांना आज देशभरता श्रद्धांजलीवाहण्याचा कार्यक्रम असतानाच पोलिसांना दहशतवाद्यांवर कारवाई करावी लागली. पोलिसांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक जनतेने घरातून बाहेर न पडत पोलिसांना सहकार्य केले. तसेच शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांनाही वर्गा बोहेर न पडण्याचे पोलिसांनी सांगितले असता विद्यालयांनीही पोलिसांना सहकार्य केले. हल्ल्यातील जखमींबाबत सुरक्षा यंत्रणांच्या अधिका-यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले आहे.
बुधवारी चार्ली हेब्डो या साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण पॅरिसमध्ये शोक दिन पाळला जात असतानाच गुरूवारी शहराबाहेरच्या परिसरात सशस्त्र हल्लेखोराने स्वयंचलित रायफलीतून केलेल्या गोळीबारात एक महिला पोलीस अधिकारी ठार झाली होती. तर शुक्रवारी दुपारी पुन्हा शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले. मासिकावरील हल्ल्यादरम्यान १२ जण ठार झाले होते तर काल शहरात झालेल्या गोळीबारात एक महिला पोलीस अधिकारी मृत्यूमुखी पडली. 'चार्ली हेब्डो' मासिकावरील हल्ला करणा-या दोन संशयितांचा शोध घेण्यासाठी सध्या फ्रान्समध्ये जोरदार शोधमोहिम सुरू आहे. त्या दोघांची छायाचित्रेही सर्वत्र जारी करण्यात आली आहेत. हे दोघेही हल्लेखोर सशस्त्र असून ते अतिशय धोकादायक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच ते कोठेही आढळले तर पोलिसांना लगेच माहिती द्यावी असे आवाहनही पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.