पॅरिस : महाराष्ट्रातील जैतापूर अणु प्रकल्पाला चालना देणे आणि ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासह भारत आणि फ्रान्स दरम्यान १७ करार करण्यात आले आहेत. नागपूरसह तीन शहरांत स्मार्ट सिटी उभारण्याची घोषणा फ्रान्सने केली. चार दिवसांच्या फ्रान्स दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील प्रमुख उद्योगपतींशी संवाद साधून त्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रित केले. फ्रान्सची अरेवा ही कंपनी जैतापुरात १०,००० मेगावॅट क्षमतेच्या ६ अणुभट्ट्या उभारणार आहे.
फ्रान्स करणार नागपूरला ‘स्मार्ट’
By admin | Updated: April 11, 2015 03:56 IST