पॅरिस: मध्य-पूर्वेतील युद्ध आणि जागतिक स्तरावर निर्माण झालेली अस्थिरता पाहून फ्रान्सने आपल्या संरक्षण धोरणात ऐतिहासिक आणि आक्रमक बदल केला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले आहे की, फ्रान्स आता आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवणार आहे. मॅक्रॉन यांचा हा निर्णय रशिया आणि इराणसारख्या देशांकडून मिळणाऱ्या धमक्यांना प्रत्युत्तर मानले जात आहे.
मॅक्रॉन यांच्या मते, सध्याचे जग अत्यंत धोकादायक वळणावर उभे आहे. केवळ अमेरिकेच्या भरवशावर न राहता युरोपने स्वतःच्या अण्वस्त्र क्षमतेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. फ्रान्सकडे सध्या सुमारे २९० अण्वस्त्रे आहेत. मॅक्रॉन यांच्या नवीन धोरणानुसार, ही संख्या लक्षणीयरीत्या वाढवली जाणार आहे, जेणेकरून कोणत्याही मोठ्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देता येईल. फ्रान्सचे हे पाऊल धक्कादायक मानले जात आहे.
इराणयुद्धाचा परिणामइराणच्या अणू कार्यक्रमामुळे आणि सध्या सुरू असलेल्या मिसाईल युद्धाने फ्रान्सला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी चीनने गुपचूप अण्वस्त्रांचा साठा वाढवत चाचण्या घेतल्याचेही समोर आले आहे. आता फ्रान्सच्या या निर्णयामुळे जगभरातील अण्वस्त्र प्रसारबंदी प्रयत्नांना धक्का बसू शकतो, मात्र मॅक्रॉन यांनी याला 'राष्ट्रीय सुरक्षेचा' प्रश्न म्हटले आहे. फ्रान्सने १९९२ मध्ये शेवटची अण्वस्त्रे वाढविली होती. यामुळे जगभरात पुन्हा एकदा अण्वस्त्रांची स्पर्धा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली असून इराण युद्धामुळे आणि अमेरिका, इस्रायलच्या दादागिरीमुळे जग आतापर्यंत न पाहिलेल्या महायुद्धाच्या छायेत आले आहे.
युरोपची नवी रणनीती?मॅक्रॉन यांच्या या विधानामुळे युरोपातील इतर देशही आता आपल्या संरक्षण बजेटमध्ये आणि अण्वस्त्र साठ्यात वाढ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीने जगातील मोठ्या शक्ती आता शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत.
Web Summary : Amid global instability and threats from Russia and Iran, France will increase its nuclear weapons arsenal. President Macron cites the need for European self-reliance and response to evolving threats, driven by Iran's nuclear program and geopolitical tensions, potentially triggering a new arms race.
Web Summary : वैश्विक अस्थिरता और रूस-ईरान से खतरों के बीच, फ्रांस अपने परमाणु हथियारों का भंडार बढ़ाएगा। राष्ट्रपति मैक्रॉन ने यूरोपीय आत्मनिर्भरता और विकसित हो रहे खतरों के जवाब की आवश्यकता बताई, जो ईरान के परमाणु कार्यक्रम और भू-राजनीतिक तनावों से प्रेरित है, जिससे एक नई हथियारों की दौड़ शुरू हो सकती है।